सायखेडा विद्यालयात झाडांना राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : बुधवार : दि ३० ऑगस्ट २०२३
β⇒ सायखेडा, ता ३० ( प्रतिनिधी : राजेंद्र कदम ) :- जनता इंग्लिश स्कूल कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी झाडांना राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. कार्यक्रमाचे आयोजन स्काऊट गाईड व चित्रकला विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. .पर्यावरणाची होत असलेली हानी व त्यासाठी जबाबदार असणारा घटक माणूस याने आपल्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी अमाप जंगलतोड करून वृक्ष संपवले आहे. त्याची जतन करणे , त्याचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे. असे प्राचार्य नवनाथ निकम यांनी बोलताना सांगितले.
विद्यार्थ्यांनी झाडांना राख्या बांधून त्यांचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा घेतली.ज्येष्ठ चित्रकला शिक्षक अरुण सावंत व विलास महाले यांच्या संकल्पनेतून साकारलेला विद्यार्थ्यांनी स्व कलाकसरीतून केलेल्या राख्या कार्यक्रमाचे खरे आकर्षण होते . विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला वृषाली शिंदे यांनी पर्यावरणाचे मानवी जीवनात असणारे महत्त्व स्पष्ट केले. यावेळी पर्यवेक्षक दौलत शिंदे, संजय बोरगुडे ,राजेंद्र कदम, संपत कांडेकर ,संजय चौधरी, सोमनाथ शिंदे, महेंद्र मोरे ,विजय सोनवणे, अरुण सावंत ,विलास महाले, ज्ञानेश्वर करपे ,शरद वाणी, पंकज गांगुर्डे ,संगीता भारस्कर ,सीमा गोसावी, प्रियंका राजोळे ,तेजस्विनी जाधव, सविता घुले, विजया मोरे वृषाली शिंदे, प्रतिक्षा शिंदे ,माधुरी झांबरे ,श्रीमती हिरे , अरुण कांगणे ,अविनाश आरोटे , टरले भाऊसाहेब , श्रीमती शिंदे, सतीश पोटे सोमनाथ कांडेकर , राहुल कारे, अमोल कांडेकर , गांगुर्डे व सर्व विद्यार्थी हजर होते.
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक :डॉ भागवत महाले , मो. ८२०८१८०५१०