β : धुळे :⇒ एकविरा देवी माध्यमिक महाविद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयात रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न- ( प्रतिनिधी : भागवत सोनवणे )
β : धुळे :⇒ एकविरा देवी माध्यमिक महाविद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयात रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न- ( प्रतिनिधी : भागवत सोनवणे )
एकविरा देवी माध्यमिक महाविद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयात रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न
β ::⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि 31, ऑगस्ट 2023
β ⇒ धुळे , ता .31, ( प्रतिनिधी : भागवत सोनवणे ) :- देवपूर ( धुळे ) येथील एकविरा शैक्षणिक मंडळाचे एकविरा देवी माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम अध्यक्ष प्रशांत वाघ व सचिव प्रदीप वाघ यांच्या मार्गदर्शनानुसार संपन्न झाला .या कार्यक्रमात सर्व विद्यार्थिनीनी विद्यार्थ्यांना राख्या बांधून आपल्या रक्षणाची अपेक्षा व्यक्त केली तर शाळेतील शिक्षकांनी शिक्षिका भगिनींच्या हातून राखी बांधून घेतली, या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सौ. जयश्रीताई प्रशांत वाघ व सौ. शैलाताई प्रदीप वाघ सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेतील मुख्याध्यापिका पी आर अहिरराव आदीसह मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेतील मुख्याध्यापिका पी आर अहिरराव , शिक्षक आर एन घोडके, जे बी फुलपगारे, एस बी वाघ, सौ भदाणे ऐ .ऐ. , बी.बी.सोनवणे, एस ए पाटील, के के शिसोदे, आरती चव्हाण, एस. डी. चव्हाण, तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
यावेळी मुख्याध्यापिका अहिरराव म्हणाल्या, की समाजातील काही चुकीच्या घटनांमुळे मुलींमध्ये व महिलांमध्ये असुरक्षित भावना निर्माण झाली आहे ,ती दूर करण्यासाठी प्रत्येकाने महिलांना सुरक्षित वाटले पाहिजे म्हणून
प्रत्येक भावाने मुली व महिलांना संरक्षण दिले पाहिजे .आपल्या परिसरात जर कुठल्या मुलीवर अन्याय होत असेल तर तिथे भावाने धावून जाणे गरजेचे आहे तरच समाजातील दृष्ट प्रवृत्ती कमी होतील. भारतीय संस्कृती पूर्वपार चालत आलेला हा उत्सव भावाने प्रत्येक वेळी बहिणीचे रक्षण केले पाहिजे , ही या मागची संकल्पना आहे . इयत्ता पाचवीच्या,सहावी च्या विद्यार्थ्यांना लहानपणापासून त्यांना संस्कार मिळावे , म्हणून हा कार्यक्रम घेण्झायात आला , असे मुख्याध्यापिका अहिरराव म्हणाल्या सांगितले .
दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले, : मो. ८२०८१८०५१०