एस. एम. आर. के.- बी.के.- ए. के. महिला महाविद्यालयात एक दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक :शुक्रवार : दि. 13 ऑक्टोबर 2023
β⇒ नाशिक ,ता. १२ ( प्रतिनिधी : छाया लोखंडे – गिरी ) :- गोखले एज्युकेशन संस्थेच्या एस. एम. आर. के.- बी.के.- ए. के. महिला महाविद्यालयातील होम सायन्स शाखा आणि होम सायन्स असोसिएशन ऑफ नाशिक (HAN) यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन केले आहे. “राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ची उच्च शिक्षणातील अंमलबजावणी” ह्या विषयावरील परिसंवादाचे आयोजन ऑनलाइन व ऑफलाइन स्वरूपात करण्यात आले आहे.
“राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०” हे २१ व्या शतकातील पहिले शैक्षणिक धोरण आहे. शिक्षण क्षेत्रातील सर्वांसाठी हे शैक्षणिक धोरण सर्वसमावेशक व सुलभ असणार आहे. ह्या परिसंवादात एन.ई.पी. २०२०: विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक, नॅक आणि एन.ई.पी. २०२० ची अंमलबजावणी , अभ्यासक्रमाच्या नियोजन , अभ्यासक्रमातील नियोजन व विकासात्मक दृष्टिकोन व अंमलबजावणी ह्या विषयांवर प्रकाशझोत टाकला जाणार आहे . या परिसंवादासाठी डॉ. मंदार भानुशे, मुंबई विद्यापीठ, मुंबई; डॉ. संजय ढोले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे; आणि डॉ. श्रीहरी पिंगळे, संगमनेर हे वक्ते वरील विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. हा परिसंवाद विद्यार्थी व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांना मार्गदर्शक व दिशादर्शक ठरेल.
हा परिसंवाद शनिवार , दि. २१ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १० ते सायं. ५ या वेळेत गो. ए. संस्थेच्या गुरुदक्षिणा परिसरात पलाश हॉल, नाशिक येथे आयोजित केला आहे. या परिसंवादाचे आयोजन प्राचार्या व परिसंवादाच्या डायरेक्टर डॉ. सौ. दिप्ती देशपांडे, सचिव, खजिनदार, व एच. आर. डायरेक्टर, गो. ए. संस्था यांच्या सक्षम मार्गदर्शनाने होत आहे. परिसंवादाच्या समन्वयक प्रो. डॉ. कविता पाटील, उपप्राचार्या ह्यांनी परिसंवादात शैक्षणिक क्षेत्रातील सर्व शालेय शिक्षक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आव्हान केले आहे. कन्व्हेनर सौ. संगिता कांबळे ह्यांनी परिसंवादाची रजिस्ट्रेशन लिंक ही महाविद्यालयाच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे, www.smrkwomenscollege.org , अशी माहिती दिली आहे.
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो. ८२०८१८०५१०