β : नाशिक :⇒ नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धनगर विरोधात आदिवासी बांधवांचा उलगुलान धडक मोर्चा ,एक लाख आदिवासींचा सहभाग – ( प्रतिनिधी : भागवत महाले )
β : नाशिक :⇒ नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धनगर विरोधात आदिवासी बांधवांचा उलगुलान धडक मोर्चा ,एक लाख आदिवासींचा सहभाग - ( प्रतिनिधी : भागवत महाले )
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धनगर विरोधात आदिवासी बांधवांचा उलगुलान धडक मोर्चा ,एक लाख आदिवासींचा सहभाग
β⇒दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि 13 ऑक्टोबर 2023
β⇒नाशिक, ता.12 ( प्रतिनिधी :भागवत महाले ) नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धनगर विरोधात आदिवासी बांधवांचा उलगुलान धडक मोर्चा निघाला यावेळी सभेत बोलतांना आम्ही अखिल भारतीय आदिवासी समाजाच्या विविध संघटनांनी राज्यातील धनगर समाजाला विरोध करत असून धनगरांना आदिवासी समाजामध्ये आरक्षण देऊ नये , अन्यथा सर्व आदिवासी आमदार सामुदायिक राजीनामा देणार , असे आवाहन विधानसभा उपाध्यक्ष- नरहरी झिरवाळ केले . ते पुढे म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणारी आदिवासी सल्लागार समितीची बैठक तत्काळ घेण्यात यावी आणि आदिवासी समाजाच्या सर्व मागण्या मान्य करण्यात याव्यात, असे सांगितले. आज जिल्हाभर आदिवासी संघटना तर्फे उलगुलान धडक मोर्चाचे आयोजन नरहरी जिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. याप्रसंगी माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, माजी आमदार धनराज महाले , माजी आमदार जीवा गावित, आमदार नितीन पवार, माजी आमदार निर्मला गावित , लकी जाधव आदींसह विविध संघटनेचे नेते उपस्थित होते. यावेळी सुरगाणा, कळवण ,दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, इगतपुरी, सटाणा , आदी तालुक्यातील एक लाखाहून अधिक आदिवासी बांधव सहभागी झाले होते. आरक्षण आमच्या हक्काचे नाही , कोणाच्या बापाचे , अशा घोषणांनी परिसर दुमदुमला होता. सर्वत्र शांततेत मोर्चा सभेनंतर संपन्न झाला .
β⇒दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले: मो. ८२०८१८०५१०