





१५ ऑक्टोंबर भारतरत्न डॉ ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिन “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा !
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : रविवार : दि.15 ऑक्टोबर 2023
β⇒सायखेडा(निफाड),ता.15 ( प्रतिनिधी : राजेंद्र कदम ):- येथील जनता इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न कै. डॉ.ए .पी .जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोंबर हा जन्मदिन” वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी भारतरत्न डॉ.ए .पी .जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाच्या प्राचार्य एन. के. निकम यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य एन के निकम होते.
भारतरत्न कै. डॉ.ए .पी .जे. अब्दुल कलाम यांचे लेखन व विचार विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचार करण्याची दृष्टी,शक्तिशाली कृती करण्याची प्रेरणा आणि चेतना देण्याचे काम करील, यात शंका नाही असे सांगितले. यावेळी प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथालयाच्यावतीने ग्रंथपाल धनवटे सर यांनी ग्रंथ वाचन पेटी उपलब्ध करून देऊन विद्यार्थ्यांनी वर्गात विविध ग्रंथांचं वाचन केले. “वाचू आनंदे “या तासिकेचे आयोजन करण्यात आले. “एक व्यक्ती एक पुस्तक भेट ” .या चांगल्या उपक्रमाची सुरुवात विद्यालयात करण्यात आली. येणाऱ्या सत्रात पुस्तके तुमच्या भेटीला या कार्यक्रमाचे विद्यालयात आयोजन केले जाईल.यावेळी उपप्राचार्य शरद शेळके यांनी डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या जीवन चरित्राचा परिचय करून दिला.त्यांनतर रोशनी साळवे, निर्जला यादव या विद्यार्थिनींनीची भाषणे झाली.
या कार्यक्रमास उपप्राचार्य शरद शेळके, पर्यवेक्षक- दौलत शिंदे, शरद वाणी, सोमनाथ शिंदे, संपत कांडेकर, अरुण सावंत, विलास महाले, सीमा गोसावी, संजय भोई, माणिक गीते, मच्छिंद्र गोहाड,संगीता भारस्कर, तेजस्विनी जाधव, प्रियंका राजोळे, सुवर्णा हिरे, ,श्रीमती झांबरे , श्रीमती मोरे, प्रतिक्षा शिंदे, वृषाली शिंदे, सविता घुले, संजय चौधरी, ज्ञानेश्वर करपे, पद्माकर पंगे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. इयत्ता सहावी क च्या वर्ग शिक्षिका श्रीमती सुवर्णा हिरे व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अवधूत आवारे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचिता कांडेकर हिने केले.आभार अशोक टरले यांनी मानले.
β⇒दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक :डॉ .भागवत महाले : मो .८२०८१८०५१०
