β : पिंपळनेर (ता.पारनेर ) :⇔ राज्यस्तरीय मॉडेल स्पर्धेत ओम साई प्रतिष्ठान फार्मसी कॉलेज विजेते-(प्रतिनिधी :अभिजित कारखिले )
β : पिंपळनेर (ता.पारनेर ) :⇔ राज्यस्तरीय मॉडेल स्पर्धेत ओम साई प्रतिष्ठान फार्मसी कॉलेज विजेते-(प्रतिनिधी :अभिजित कारखिले )
राज्यस्तरीय मॉडेल स्पर्धेत ओम साई प्रतिष्ठान फार्मसी कॉलेज विजेते
β:पिंपळनेर:⇔राज्यस्तरीय मॉडेल स्पर्धेत ओम साई प्रतिष्ठान फार्मसी कॉलेज विजेते-(प्रतिनिधी :अभिजित कारखिले)
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार : दि, 02 मार्च 2024
β⇔ पिंपळनेर (ता.पारनेर ), : दि,1(प्रतिनिधी : अभिजित कारखिले ):- अहमदनगर येथील एन.एन. सत्था फार्मसी (डिप्लोमा) कॉलेज आयोजित राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्ताने राज्यस्तरीय मॉडेल बनवण्याच्या स्पर्धेत पिंपळनेर, ता. पारनेर, जि. अहमदनगर येथील ओम साई प्रतिष्ठान फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून प्रथम क्रमांकाचे पटकावला आहे. या यशाबद्दल तालुक्यात कौतुक व अभिनंदन होत आहे.
सदर स्पर्धेमध्ये नावीन्यपूर्ण संकल्पना असलेल्या ४० मॉडेल प्रकल्पांचा सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेमधून ओम साई प्रतिष्ठान कॉलेज ऑफ फार्मसीचे साहिल शेख व सुरज भोसले यांच्या “स्वयंचलित औषध वितरण मशिन” या मॉडेल ची प्रथम क्रमांकावर निवड करण्यात आली. या विद्यार्थ्यांना एन. एन. सत्था कॉलेजच्या प्राचार्य डॉ.पांडे आणि विभागप्रमुख डॉ.गवळी सर यांच्या हस्ते ट्रॉफी व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. या मॉडेल प्रकल्पासाठी प्रा. अजय अडे, प्रा. अनिता रोकडे, प्रा. तेजस्वी मुळे यांचे मार्गदर्शन लाभले. ओम साई प्रतिष्ठान फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर मिळविलेल्या यशाबद्दल संस्थेच्या सर्व विश्वस्तांनी सर्वांचे अभिनंदन केले.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो. 8208180510