β : नाशिक :⇔शेतकऱ्यांचा मोर्चा अखेर मागे, सकारात्मक चर्चेतून तोडगा-(खास प्रतिनिधी: पांडुरंग बिरार)
β : नाशिक :⇔शेतकऱ्यांचा मोर्चा अखेर मागे, सकारात्मक चर्चेतून तोडगा-(खास प्रतिनिधी: पांडुरंग बिरार)
शेतकऱ्यांचा मोर्चा अखेर मागे, सकारात्मक चर्चेतून तोडगा
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि, 04 मार्च 2024
β⇔: नाशिक : दि,4( खास प्रतिनिधी: पांडुरंग बिरार):- भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार जे.पी. गावित यांच्या नेतृत्वात विविध माग्यांसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. त्यांच्या मागण्यांसंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात शिष्टमंडळा समवेत बैठक घेवून चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यासोबत फोनवरून संवाद साधत माजी आमदार गावित यांच्यासोबत पालकमंत्री ना. दादाजी भुसे यांनी बोलणे करून दिले.
शिष्टमंडळ सोबत सकारात्मक चर्चा करून तोडगा काढण्यात आला. यामुळे गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन अखेर मागे घेण्यात आले असून 3 महिन्याचा कालावधीत शासनातर्फे माजी आमदार गावित यांच्या मागण्या मान्य करण्याचे प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आज शासनाच्या वतीने दिले.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो. 8208180510