





श्री. पंचवटी एजुकेशन सोसायटी संस्थेत “आंतरराष्ट्रीय महिला दिन” उत्साहात साजरा

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि, 15 मार्च 2024
β⇔नाशिक (पंचवटी), दि,15(प्रतिनिधी: चेतना कापडणे ): “ती आहे, म्हणून हे विश्व आहे. ती आहे, म्हणून घराला घरपण आहे. ती आहे, म्हणून नात्यात जिवंतपणा आहे. तिचा सन्मान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.” असे प्रतिपादन श्री. पंचवटी एजुकेशन सोसायटी संस्थेचे अध्यक्ष श्री.नरेंद्रभाई ठक्कर यांनी ‘आंतरराष्ट्रीय महिला’ दिनानिमित्त महिलांना मार्गदर्शन व सन्मान करतांना केले. सचिव उपेंद्रभाई दिनानी यांच्या सहकार्याने यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अंचल दिनानि व डॉ. शिवानी देशपांडे यांनी महिलांना मार्गदर्शन केले.
डॉ. अंचल दिनानि या प्रख्यात फिजिओथेरपिस्ट आहेत ज्यांचे झेन फिजिओ आणि कैझन पिल्लेटस हे क्लिनिक आहेत. कार्यक्रमाप्रसंगी डॉ. अंचल दिनानि यांनी महिलांसाठी दैनंदिन जीवनात आवश्यक असणारे व्यायाम , फिजिओथेरपीचे महत्व याबद्दल प्रात्यक्षिक देऊन मार्गदर्शन केले. पेन मॅनेजमेंट याबद्दल महिलांसोबत चर्चा केली व त्याबद्दल मार्गदर्शन केले.
त्यानंतर त्यांनी संस्थेअंतर्गत असणारे एस.एन.पी.टी इंस्टिट्युट ऑफ फार्मसी या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ही व्यायाम, फिजिओथेरपी आणि पेन मॅनेजमेंट याबद्दल प्रात्यक्षिक देऊन मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. चंद्रशेखर जोशी यांनी केले.तर डॉ. अंचल दिनानि यांची ओळख डॉ. अमर झाल्टे यांनी करून दिली . सदर कार्यक्रमात संस्थेतील ट्रस्टी चंद्रकांतभाई बाटविया, सचिव देवेंद्रभाई पटेल, फार्मसी विभागाचे सहसचिव अभयभाई चोक्सी, संस्था संचालक मंडळातील उरवीशभाई जोशी, महेंद्रभाई मजेठिया हे उपस्थित होते. संस्थेतील सर्व विभागाचे प्राचार्य, शिक्षक देखील उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार प्रा. अभय पांढरकर यांनी व्यक्त केले.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510