β : येडशी(उस्मानाबाद) :⇔येडशीत महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आमदार-कैलास पाटील यांची जाहीर सभा संपन्न-(प्रतिनिधी : सुभान शेख)
β : येडशी(उस्मानाबाद) :⇔येडशीत महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आमदार-कैलास पाटील यांची जाहीर सभा संपन्न-(प्रतिनिधी : सुभान शेख)
येडशीत महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आमदार-कैलास पाटील यांची जाहीर सभा संपन्न
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : रविवार : दि, 5 मे 2024
β⇔येडशी(उस्मानाबाद),दि.5 (प्रतिनिधी : सुभान शेख):-उस्मानाबाद – धाराशिव लोकसभा मतदारसंघात सौ. अर्चनाताई राणा जगजितसिंग पाटील या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवार म्हणून उभ्या आहेत तर प्रतिस्पर्धी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष्याकडून ओमप्रकाश राजे निंबाळकर हे उमेदवार उभे आहेत. आगामी निवडणुकीच्या तिसऱ्या टप्पात 7 मे मंगळवार रोजी मतदान होत आहे. या लोकसभेच्या निवडणुकीत दीर-भावजयमध्ये ‘कॉंटे की टक्कर’ होण्याची चिन्हे येडशी गावातील नागरिकांना दिसत आहे.
आज दि.5 मे रविवार रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास उस्मानाबाद-धाराशिव – कळंब मतदार संघाचे निवडुन आलेले आमदार – कैलास(घाडगे) पाटील यांची येडशी शहरात ‘उस्मानाबाद-धाराशिव’ लोकसभा मतदारसंघात उभे असलेले उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आमदार-कैलास (घाडगे)पाटील यांच्या हस्ते प्रचारार्थ डॉ.बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले, त्यानंतर प्रचार सभेला सुरुवात करण्यात आली. या निवडणूक सभेला येडशी गावातील असंख्य नागरिकांनी प्रतिसाद दिला. यावेळी सामाजिक ,राजकीय, शेतकरी यांचे प्रश्न सोडवणार असे जाहीर केले.यावेळी सभेला आमदार-कैलास(घाडगे) पाटील, विजय कुमार सस्ते,सुनील शेळके, संजय पाटील, अमर पवार, संजय पाटील दुधगावकर, विनोद(पिंटु) पवार, सर्फराज पटेल आदिंनी गावातील सर्व नागरिकांनी या सभेला उपस्थिती दाखवली.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )