β : सुरगाणा (शहर),(नाशिक) :⇔सुरगाणा जिल्हा परिषद शाळेत पिंपळ वृक्षाचा वाढदिवस उत्साहात साजरा; एक मूल एक झाड उपक्रम-(प्रतिनिधी : रतन चौधरी)
β : सुरगाणा (शहर),(नाशिक) :⇔सुरगाणा जिल्हा परिषद शाळेत पिंपळ वृक्षाचा वाढदिवस उत्साहात साजरा; एक मूल एक झाड उपक्रम-(प्रतिनिधी : रतन चौधरी)
सुरगाणा जिल्हा परिषद शाळेत पिंपळ वृक्षाचा वाढदिवस उत्साहात साजरा
शाळेत दहा पिंपळ वृक्षांची लागवड; एक मूल एक झाड उपक्रम
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : मंगळवार : दि. 23 जून 2024
β⇔ सुरगाणा (शहर),(नाशिक) दि.23 (प्रतिनिधी : रतन चौधरी):- आज २३ जुलै वनसंवर्धन दिनाचे औचित्य साधत जिल्हा परिषद शाळा सुरगाणा नं.१ येथील विद्यार्थ्यांनी सतरा वर्षीय पिंपळाच्या वृक्षाचा वाढदिवस धो धो पावसात भिजत उत्साहात साजरा करण्यात आला.पुर्वी शाळा नं १ व २ या दोन्ही शाळा दुबार पद्धतीने एकाच इमारतीच्या आवारात भरविण्यात येत होत्या. सतरा वर्षापुर्वी शाळा नं. १ ला सर्व शिक्षा अभियान अंतर्गत नवीन इमारत झाल्यानंतर या आवारात पिंपळसोंड गावचे रहिवासी पर्यावरण प्रेमी शिक्षक रतन चौधरी यांनी एक पिंपळाचे लहानशे रोपटे तत्कालीन ग्रामपंचायत पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनच्या बांधलेल्या व्हाल्व मधील जागेवरून आणून शाळेच्या आवारात लावले. ते आज सतरा वर्षांच्या कालावधीत खुप मोठे झाले आहे.” इवलेसे रोप लावीयले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी ” याची प्रचिती आली आहे.
शालेय विद्यार्थ्यांनी खाऊच्या जमवलेल्या पैशातून केक आणत मोठ्या जल्लोषाने सतरावा वाढदिवस केक कापून उत्साहात साजरा केला. पिंपळ वृक्षाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी वृक्ष संवर्धनाची प्रतिज्ञा घेतली. चौधरी यांनी ” वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ” असे आमच्या संतानी फार वर्षापूर्वीच सांगून ठेवले आहे. आपल्या शेती प्रधान संस्कृतीत पूर्वजांनी वड, पिंपळ, तुळस,आंबा,लिंब अशा असंख्य प्रकारच्या झाडांना महत्त्व दिले आहे. या देशी झाडांचे वृक्षारोपण करून त्यांचे योग्य संवर्धन व जतन केले तर या झाडांमुळे भरपूर प्रमाणात पाऊस पडू शकतो. त्यामुळे मुबलक पाणी, सावली, आॅक्सिजन, मिळतो तसेच बाष्प टिकून राहते.भूजल पातळी वाढते त्यामुळे आपोआप तापमानात घट होते.म्हणून प्रत्येकाने वृक्षारोपण आणि संवर्धन करणे हि काळाची गरज आहे. झाडा शिवाय निसर्ग नाही आणि निसर्गा शिवाय सजीव प्राणी जीवन नाही असे महत्त्व शालेय विद्यार्थ्यांना पटवून दिले.
यावेळी विद्यार्थ्यांनी घराजवळ, शेतात एक मुल एक झाड लावण्याचा संकल्प केला. शाळा नं. १ या शालेय आवारात सुमारे दीडशे पेक्षा जास्त वृक्षाची लागवड करून संवर्धन व जतन केले आहे त्यामुळे शालेय आवार हिरवाईने नटलेले आहे. यामध्ये पिंपळ, कांचन, सुबाभळ, आस्ट्रेलियन बाभळ, उंबर, चिंच ,बोर, चेरी, आंबा, फणस या झाडांचा समावेश आहे. सतरा वर्षे झालेला पिंपळ शालेय प्रांगणात विस्तीर्ण पसरल्याने विद्यार्थी बांधलेल्या ओट्यावर बसून सावलीत मनसोक्त जेवण करीत आहेत.सोबतच पानांची सळसळ सुमधूर संगीत कानी येत आहे.मे, जून मध्ये तर शालेय आवारात पिंपळ फळांचा आस्वाद घेण्यासाठी पक्ष्यांच्या दिवसभर किलबिलाट सुरु असतो. वनसंवर्धन दिनानिमित्त शालेय आवारात मराठी पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष यशवंत पवार, कार्याध्यक्ष बाजीराव खैरनार, जिल्हाध्याक्ष अण्णासाहेब बोरगुडे यांच्या मार्फत मिळालेल्या पंचवीस पिंपळ रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी मुख्याध्यापक सुरेश जाधव, सोमनाथ भोये, रतन चौधरी, सुधाकर भोये, नाथ देशमुख, यशवंत देशमुख सह शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज”)