“शासनाला मदतीचा हात दिल्यास मोठे काम होऊ शकते” : जिल्हाधिकारी – जलज शर्मा यांचे सुळे वांगण येथे प्रतिपादन
β⇔सुरगाणा(नाशिक):⇔ “शासनाला मदतीचा हात दिल्यास मोठे काम होऊ शकते” : जिल्हाधिकारी-जलज शर्मा यांचे सुळे वांगण येथे प्रतिपादन-(प्रतिनिधी : रतन चौधरी)
भर पावसात तालुक्यातील सुळे या अतिदुर्गम गावाला भेट
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : गुरुवार : दि, 25 मे 2024
β⇔सुरगाणा(नाशिक), दि. 25(प्रतिनिधी : रतन चौधरी ):-सुळे वांगण , तालुका सुरगाणा येथे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी ‘ स्वदेश फाउंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, “ग्रामस्थांनी शासनाला मदतीचा हात दिला तर खूप मोठे काम होऊ शकते.”असे प्रतिपादन केले. स्वदेश फाउंडेशनच्या वतीने सुळे गावात विविध विकास कामे सुरू असून शेती, शिक्षण, आरोग्य या कामांची पाहणी करण्यासाठी शर्मा आले होते.
β⇔सुरगाणा(नाशिक):⇔ “शासनाला मदतीचा हात दिल्यास मोठे काम होऊ शकते” : जिल्हाधिकारी-जलज शर्मा यांचे सुळे वांगण येथे प्रतिपादन-(प्रतिनिधी : रतन चौधरी)
यावेळी व्यासपीठावर कळवणचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी पुलकित सिंह, निवासी नायब तहसीलदार मोहन कुलकर्णी, ग्रामसेवक माधव गावित, तलाठी भोंडवे, आरोग्य विभागाचे जाधव, वनरक्षक अलका भोये, स्वदेश फाउंडेशनचे डायरेक्टर तुषार इनामदार, वरिष्ठ व्यवस्थापक मनोज अहिरे, संकेत तांदळे, तालुका व्यवस्थापक दीपक गिरे, राजेंद्र गुंड, विकास वारघडे, दीपक कदम, वरिष्ठ समन्वयक कल्पना महाले, दीपक मोरे, सत्यवान काळे, सादिक पटेल, विलास पावरा, नितीन डोंगरदिवे, अशोक गोपाळ, तुकाराम बोरसे, अरुण सुगर, निलेश जावळे, सदैव पाटीदार, मयूर गायकवाड, अमित कुलकर्णी, तुषार आमरे, अविनाश नाईक इत्यादी उपस्थित होते.
शर्मा म्हणाले की, “जिल्हाधिकारी पदावर काम करणे खूपच कठीण असते. जिल्ह्यात एक हजार चारशे ग्रामपंचायती आहेत. तीन वर्षांच्या कारकिर्दीत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये फिरू शकत नाही. ज्या ठिकाणी ग्रामस्थांकडून चांगले काम केले जाते आहे, त्या ठिकाणी जायचे ठरविले आणि एक महिन्यापूर्वीच येण्याचे नियोजन केले होते. कामात व्यस्त असल्याने येता आले नाही. परंतु, काहीही करून सुळे गावात जायचेच असा निश्चय केला होता. आज तो योग आला. गावाने शेती, शिक्षण, आरोग्य या बाबतीत चांगले काम केले आहे. याचा सार्थ अभिमान वाटतो आहे.”
β⇔सुरगाणा(नाशिक):⇔ “शासनाला मदतीचा हात दिल्यास मोठे काम होऊ शकते” : जिल्हाधिकारी-जलज शर्मा यांचे सुळे वांगण येथे प्रतिपादन-(प्रतिनिधी : रतन चौधरी)
शर्मा यांनी पुढे सांगितले की, “शासनाच्या माध्यमातून स्वदेश फाउंडेशनच्या वतीने रायगड जिल्ह्यात चांगले काम केले आहे. गावातील लोकांमध्ये मैत्रीची भावना, एकजूट पाहावयास मिळाली. गाव तंटामुक्त असून भांडण तंटामुक्त नाही. देशात एकेक गाव, तालुका, जिल्हा, राज्य या दिशेने वाटचाल केली तर राज्य तसेच देशपातळीवर चांगला सन्मान मिळेल. सुळे हे गाव इतरांना प्रेरणास्थान बनले आहे. याचा तालुक्याला अभिमान वाटला पाहिजे. इतरांना नवीन काहीतरी शिकण्याची भावना गावाने निर्माण केली आहे. गाव अडचणीचे असले तरी नवनवीन प्रयोग व श्रमदानाने अडचणीवर मात करता येते हे गावाने एकजुटीने दाखवून दिले आहे. शंकाचे निराकरण झाले पाहिजे. आरोग्य, शिक्षण यावर भर देणे आवश्यक आहे. स्वदेश फाउंडेशनने संधी दिली आहे. या संधीचे सोने केले पाहिजे. शेतकऱ्यांनी सफेद मुसळी लागवडीचा केलेला प्रयोग हा गाव विकासाला समृद्धीकडे वाटचाल करणारा आहे. गाव व परिसरातील वातावरण बघून आनंद झाला आहे.”
कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेले आदिवासी नृत्य पाहून शर्मा भारावून गेले. यावेळी प्रगती गाव विकास समितीचे अध्यक्ष पांडुरंग धुम, खजिनदार हिरामण धुम, सचिव चंद्रकला धुम, समितीचे सदस्य विठ्ठल धुम, विलास राऊत, रमेश मेघा, प्रभा गावित, लता गावित, मनोहर खुरकुटे, भीमा पाडवी, मनोहर पाडवी, रमेश धुम, रमेश भुसारे, मंजुळा पवार, सफेद मुसळी प्रगतशील शेतकरी माधव गायकवाड, स्वदेश मित्र जयवंती महाले, पशू मित्र प्रकाश शेवर, एसआरटी सेवक चिंतामण धुम आदी उपस्थित होते.
β⇔सुरगाणा(नाशिक):⇔ “शासनाला मदतीचा हात दिल्यास मोठे काम होऊ शकते” : जिल्हाधिकारी-जलज शर्मा यांचे सुळे वांगण येथे प्रतिपादन-(प्रतिनिधी : रतन चौधरी)
फोटो: सुरगाणा तालुक्यातील सुळे वांगण येथे स्वदेश फाउंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी जलज शर्मा, सहाय्यक जिल्हाधिकारी पुलकित सिंह, स्वदेश फाउंडेशनचे कर्मचारी.
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )
🅱️ :नागपूर:⇔ गुढीपाडवा: संपूर्ण सृष्टीसाठी शुभ,समृद्ध, नवचैतन्य व मांगल्याचे प्रतीक-(प्रतिनिधी-रमेश लांजेवार)
4 days ago
🅱️ : सुरगाणा (नाशिक):⇔कोल्हापूर रंगभूमीवर विधिनाट्य महोत्सवात आदिवासी कला संस्कृतीचे दर्शन ! कलाप्रेमी रसिकांना आदीम संस्कृतीची भुरळ; हजारो प्रेक्षकांनी घेतला आनंद !-(प्रतिनिधी-रतन चौधरी)
7 days ago
🅱️: वणी (नाशिक):⇔वणी येथे पुणेगाव धरण्याचा डाव्या कालव्यात पडून शाळकरी आठ वर्षीय बालकांचा आकस्मिक मृत्यू-(प्रतिनिधी-सुरेश सुराशे )
7 days ago
🅱️: निफाड( नाशिक):⇔सेवानिवृत्त शिक्षकांची अंशराशीकरणाची १२ लाखापेक्षा अधिक रक्कमेचा अपहार;साखळी उपोषण तदनंतर आमरण उपोषण-(प्रतिनिधी-रावसाहेब जाधव)