





त्र्यंबकेश्वर महाविद्यालयास ”गबुला फौंडेशन लायब्ररी फॉर ऑल” नाशिक तर्फे शैक्षणिक पुस्तके भेट

β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि 18 ऑक्टोबर 2024
β⇔नाशिक : ता.18 ( प्रतिनिधी : डॉ. भागवत महाले):-त्र्यंबकेश्वर येथील मविप्र समाजाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्ताने ‘वाचन प्रेरणा दिवस’ साजरा करण्यात आला. गबुला फाउंडेशनचे संस्थापक अब्बास आणि इस्मत गबुला फाउंडेशन यांच्याकडून इनरव्हील क्लब ऑफ नाशिकच्या सदस्या सरोज दशपुते यांच्या सौजन्याने ”गबुला फौंडेशन लायब्ररी फॉर ऑल” नाशिक तर्फे विद्यार्थ्यांना विविध प्रकारची प्रेरणादायी, स्पर्धात्मक परीक्षांची, तसेच शैक्षणिक पुस्तके भेट दिली होती.

सदर पुस्तकांचे ग्रंथालयात डॉ. वर्षा जुन्नरे यांनी ग्रंथ प्रदर्शन आयोजित करून ते विद्यार्थ्यांना वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप पवार यांनी वाचन संस्कृती कशी विकसित करता येईल याविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाविद्यालयातील डॉ. शरद कांबळे, डॉ. भागवत महाले, डॉ. संतोष जाधव, प्रा. मनोज मगर सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510
ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )