





‘राष्ट्रीय सेवा योजनेतून विद्यार्थ्यांना सामाजिक नितीमूल्य व श्रम संस्काराची शिकवण मिळते’– हरिभक्त परायण प्रा. भगवान महाराज शिंदे

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार : दि.25 जानवरी 2025
β⇔नाशिक,ता.25(प्रतिनिधी: शाश्वत महाले ):-विद्यार्थी दशेत आणि राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यार्थी म्हटल्यावर इतर विद्यार्थ्यांपेक्षा तुमच्यामध्ये सामाजिक नितीमूल्य आणि समाजसेवा याविषयी अधिक जागृती असणे आवश्यक आहे. तसेच आपण दैनंदिन जीवनामध्ये विविध प्रसार माध्यमांचा वृत्तपत्रांचा वापर करून आपल्या ज्ञानामध्ये भर घालण्यासाठी मोबाईल कामापुरता वापर केला पाहिजे, अन्यथा दुष्परिणाम भोगावे लागतात.
मविप्र समाजाचे कला ,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय मखमलाबाद येथील राष्ट्रीय सेवा योजना शिबिर आयोजित कार्यक्रमात बोलतांना ते पुढे म्हणाले, की विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे दिवस त्यातील आठवणी आणि त्यातील अनुभव जीवनामध्ये अनुकरण केल्यास आपल्या जीवनामध्ये यश नक्की मिळेल. तसेच आपण सामाजिक जबाबदारी भविष्यात यशस्वीपणे पार पडल्यास आपणही राजकारणाने समाजकारणात यश मिळवाल तसेच आपल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून महाविद्यालयीन मित्र-मैत्रिणींशी नातं जपून एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हा तसेच राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि संत गाडगे बाबा संत तुकाराम यांचे विविध दाखले देऊन मार्गदर्शन केले प्रा. भगवान शिंदे यांनी मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सचिन एस. राजोळे, डॉ.विलास पवार, प्रा.बाळासाहेब वाघ, डॉ.ज्ञानेश्वर पवार, डॉ. आर. डी. खुर्चे, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक सेवक राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी विद्यार्थिनी समन्वयक प्राध्यापककल्पना चोपडे आणि ए.के .ठाकरे उपस्थित होते.

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज’ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )