





येडशी बसस्थानक परिसरातील महिला शौचालयाचे काम पूर्ण – प्रवासी महिलांत आनंदोत्सव

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : रविवार : दि.9 फेब्रुवारी 2025
β⇔येडशी (धाराशिव )दि.3 (प्रतिनिधी: सुभान शेख ):- धाराशिव तालुक्यातील येडशी बसस्थानक परिसरात अपूर्ण राहिलेले महिला शौचालयाचे काम अखेर पूर्ण झाले आहे. अनेक वर्षांपासून हे काम अर्धवट सोडले गेले होते. लातूर जिल्ह्यातील मुरुडचे ठेकेदार हे काम अपूर्ण अवस्थेत सोडून गेल्याने प्रवासी महिलांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता.
या समस्येकडे दिव्य भारत बीएसएम न्यूज चे येडशी प्रतिनिधी सुभान शेख यांनी लक्ष वेधले. 11 जानेवारी 2025 रोजी “येडशी बसस्थानक परिसरात महिला शौचालयाचा अभाव – प्रवासी महिलांची गैरसोय, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष” ही बातमी प्रकाशित करण्यात आली. त्यानंतर, एसटी महामंडळ धाराशिव आगाराचे वरिष्ठ अधिकारी विभागणी यंत्रक विनोद भालेराव, आगार व्यवस्थापक बालाजी भांगे, आणि डिव्हिजन अधिकारी शशिकांत उबाळे यांनी तातडीने दखल घेतली.
3 फेब्रुवारी 2025 रोजी महिला शौचालयाच्या अपूर्ण कामाला सुरुवात करण्यात आली. या अंतर्गत खालील कामे करण्यात आली:
✅ पाण्याच्या नळांची दुरुस्ती करून शौचालयात नवीन फिटिंग बसवण्यात आले.
✅ 1000 लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बसवण्यात आली.
✅ शौचालयात योग्य प्रकाशव्यवस्था निर्माण करण्यासाठी लाईट बसवण्यात आले.
✅ महिला शौचालयाला आवश्यक आडोसा (प्रायव्हसीसाठी संरक्षक भिंत) उभारण्यात आला.
✅ दररोज शौचालयाची स्वच्छता राखण्यासाठी दिवसातून दोन वेळा लिक्विड क्लिनरने फरशी धुण्याच्या सूचना देण्यात आल्या.
यामुळे प्रवासी महिलांनी मोठ्या आनंदाने समाधान व्यक्त केले आहे. महिला प्रवाशांनी बसस्थानकाच्या व्यवस्थापनाकडे शौचालयाची नियमित देखभाल आणि स्वच्छतेसाठी योग्य व्यवस्था ठेवावी, अशी मागणी केली आहे.
महिला शौचालयाचे काम पूर्ण झाल्याने एसटी महामंडळ धाराशिव आगाराचे वरिष्ठ अधिकारी, ठेकेदार, तसेच दिव्य भारत बीएसएम न्यूज चे संपादक डॉ. भागवत महाले आणि येडशी प्रतिनिधी सुभान शेख यांचे प्रवासी महिलांतर्फे विशेष कौतुक करण्यात येत आहे.