
बोरगाव प्रतिनिधी : लक्ष्मन बागुल :-

पेठ तालुक्यातील ग्रामपंचायत हरणगाव अंतर्गत आज दि 19 सप्टेंबर 2025 वार शुक्रवार रोजी महिलांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात महिलांना स्वावलंबन, रोजगारनिर्मिती, याबाबत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पं.स.पेठचे सहाय्यक कार्यकम अधिकारी माननीय ओमकार जाधव यांनी केले.

सदर कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन व सरस्वती पुजनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामपंचायत, हरणगाव च्या सरपंच पल्लवी विजय भरसट ह्या होत्या प्रमुख पाहुणे ओमकार जाधव, संकल्प कौशल्य फाउंडेशन चे किशोर जाधव तसेच तृप्ती देशमुख, सहा. कृषी अधिकारी हरणगाव सुनिल भुसारे , धनंजय गावंढे (म्हसगण) तसेच ग्रामपंचायत अधिकारी श्री.मोहन गायकवाड . माध्यमिक शाळा हरणगाव चे मुख्याध्यापक श्री. धनंजय चव्हाण सर.वन विभागच्या पुष्पा भोये T O, विशाल मोरे इ. मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा पल्लवीताई यांनी महिलांनी आत्मविश्वासाने पुढे येवून समाजाच्या सर्व क्षेत्रात नेतृत्व करावे असे आवाहन केले. प्रशिक्षणात हस्तकला कौशल्य, प्रशिक्षणाबाबत मार्गदर्शन केले, यवेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.’कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित महिलांनी अशा उपक्रमांमुळे आत्मनिर्भरतेचा मार्ग अधिक सोपा होतो असे समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामपंचायत अधिकारी श्री.मोहन गायकवाड .यांनी मान्यवरांचे आभार मानत अध्यक्षांच्या वतीने कार्यकमाची सांगता करण्यात आली.
हरणगावात महिला सक्षमीकरणासाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन