
हातगड(सुरगाणा),प्रतिनिधी : लक्ष्मण पवार –

हातगड (सुरगाणा):- दि. 25 सप्टेंबर 2025 रोजी ग्रामपंचायत हतगड (किल्ला) तालुका सुरगाणा येथे स्वच्छ भारत (ग्रामीण) अंतर्गत स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत एक तास, एक दिवस, महाश्रमदान मोहीम मुख्यकार्यकारी कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक व उपमुख्यकार्यकारी अधिकारी (पावस्व) जिल्हा परिषद नाशिक व गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शना खाली स्वच्छता ही सेवा अंतर्गत गटविकास अधिकारी जे. टी. सूर्यवंशी , तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणवीर , उप अभियंता ग्रा.पा.पु. विवेकानंद निकम , पशुधन अधिकारी नरेंद्र भागवत, सहाय्यक प्रशासन अधिकारी, राजेश वाघेरे , विस्तार अधिकारी(ग्रा.प) आर.एस.झिरवाळ ,विस्तार अधिकारी (ग्रा. पं) एम.पी.गावित विस्तार अधिकारी आरोग्य. शुभम बैरागी वनविभागाचे अधिकारी यांच्या हस्ते वृक्षरोपण करुन ग्रामपंचायत हतगड(किल्ला) येथे स्वच्छता करण्यात आली.
स्वच्छता रॅली, स्वच्छता शपथ, माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत इ प्लेज घेण्यात आली. यावेळी सरपंच महोदय देविदास दळवी ,ग्रा.प.सदस्य, सुरगाणा गटातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी,समूह समन्वयक दिलीप गांगुर्डे, इंजिनिअर नितीन गावित , ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.