संत बलजीत सिंग महाराज विश्व मानव रूहानी केंद्रातर्फे सुरगाणा तालुक्यात लहान तळपाडा येथे गरिब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
β : साक्री :⇒ संत बलजीत सिंग महाराज विश्व मानव रूहानी केंद्रातर्फे सुरगाणा तालुक्यात लहान तळपाडा येथे गरिब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : बुधवार : दि. 11 ऑक्टोबर 2023
β⇒ साक्री , ता .11 ( प्रतिनिधी : दीपक मोरे ) :– संत बलजीत सिंगजी यांच्या अखंड प्रेरणेने नाशिक जिल्ह्यातील विविध प्राथमिक जिल्हा परिषद शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यामध्ये देवलदरी- 225 , लहान तळपाडा-15, मोठा तळपाडा-43, पालविहिर -62, मिलनपाडा -13, वरसवाडी-24 , जामुने-25, भोकरपाडा-10, चापापाडा-22 , भदर-74, नवापूर -13 ,चुली-32, भोरमाळ-35 , पिसोरे- 28, सातबाभळ-40 आदि शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. सुरगाणा तालुक्यातील लहान तळपाडा येथे शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम प्रसंगी माजी सरपंच व सुरगाणा नगरसेवक रमेश थोरात, माजी ग्रामपंचायत सदस्य शंकर महाले , हिरामण देशमुख, विजय महाले , शाळेचे मुख्याध्यापक श्री. बंगाळ सर यांच्या हस्ते बूट, दप्तर, पाणी बॉटल, कंपास, वही, आदि शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी बहुसंखेने ग्रामस्थ उपस्थित होते.सदर कार्यक्रम विश्व मानव रूहानी केंद्र अंतर्गत संपन्न झाला .
विश्व मानव रूहानी केंद्र हे एक आध्यात्मिक संस्था असून ही संस्था नेहमी गोरगरिबांच्या कल्याणासाठी आपलं सेवाभावी कार्य करत असते. सदर संस्था विश्व मानव रूहानी केंद्र 2005 पासून अनाथ विद्यार्थी , आजारी, वृद्ध, त्यांना वैद्यकीय व शैक्षणिक क्षेत्रात , सामाजिक सेवा कार्यक्रमात सक्रिय राहून मदत करत असते . मानवतेच्या सेवा करण्याकरिता काम करत आली आहे. संत बलजीत सिंग महाराज विश्व मानव रूहानी केंद्र संस्थामार्फत वैद्यकीय तपासणी, शैक्षणिक साहित्य वाटप व सामाजिक कार्य नेहमी प्रशासनाला सोबत करत असते. सदर संस्थेचे मुख्यालय नवानगर, तहसील कालका, जिल्हा – पंचकुला ( हरियाणा ) येथे असून संपूर्ण भारतात 240 केंद्र आहेत.
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक :डॉ भागवत महाले : मो ८२०८१८०५१०