





‘उत्तम प्रशासक, न्यायप्रिय, नीतीमुल्ये या ‘छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या गुणांचा अंगीकार करणे काळाची गरज !’ –प्रा.जावेद शेख
β : त्र्यंबकेश्वर :⇔ ‘उत्तम प्रशासक, न्यायप्रिय, नीतीमुल्ये या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुणांचा अंगीकार करणे काळाची गरज !’ -प्रा.जावेद शेख – ( प्रतिनिधी : समाधान गांगुर्डे )
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा :नाशिक : मंगळवार : दि 31 ऑक्टोबर 2023
β⇔ त्र्यंबकेश्वर ,ता.31 ( प्रतिनिधी : समाधान गांगुर्डे ) :- ”उत्तम प्रशासक, न्यायप्रिय, नीतीमुल्ये, धर्मनिरपेक्ष या तत्वांतील गुणांचा वापर करून आपल्या लाडक्या जनतेसाठी राज्यकारभार करणारे महाराष्ट्राचे आराध्य दैवत ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुणांचा अंगीकार करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन इतिहासाचे अभ्यासक , कवी , नाटककार प्रा.जावेद शेख यांनी केले. ते मविप्र समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,त्र्यंबकेश्वर येथे बहि:शाल शिक्षण मंडळ अंतर्गत डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज व आजचा मावळा ‘या विषयावर समारोप प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.ते पुढे म्हणाले की “आजच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजण्यासाठी खरा इतिहास वाचणे गरजेचे आहे.नाहीतर समाज जातीधर्मात टेड निर्माण होवून लयास जाईल, याची भीती वाटत आहे. समाजाला महाराजांनी किल्ले कसे बांधले त्यापेक्षा त्यांची मूल्ये कळणे महत्त्वाचे आहे.”असे त्यांनी सांगितले .
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. दिलीप पवार म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज हे युद्ध नितीत अत्यंत निपुण होते. कोणत्याही कृतीचे नियोजन अत्यंत सूक्ष्म पद्धतीने व विचारपूर्वक करत असत, जे आज फार दुर्मिळ आहे. विज्ञानातील ध्वनी आणि प्रकाशाचा युद्धनितीमध्ये चाणाक्षपणे वापर करून त्यांनी अनेक लढाया जिंकल्या आहेत. तसेच आरमार आणि गडकोट किल्ल्यांच्या उभारणीत त्यांच्या वास्तूशास्त्र ज्ञानाचे सखोल दर्शन घडते.”असे सांगितले .
सदर तीन दिवसीय व्याख्यानमालेत ॲड. मयूर जाधव, सौरभ कापडे व प्रा.जावेद शेख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे केंद्र कार्यवाह डॉ.मनिषा पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर पाहुण्यांचा परिचय डॉ. भागवत महाले यांनी केला. कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.शरद कांबळे, कनिष्ठ महाविद्यालय सत्रप्रमुख श्रीमती विद्या जाधव,सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व मोठया संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन सत्र प्रमुख डॉ.राजेश झनकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. भागवत महाले यांनी केला तर आभारप्रदर्शन प्रा. ललिता सोनवणे यांनी केले.
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज :मुख्य संपादक :डॉ भागवत महाले : मो. ८२०८१८०५१०
