





पाथर्डी गाव येथे शिवमहापुराण कथेला भाविकांची मांदियाळी, भगवान शंकरांच्या गजराने संपूर्ण परिसर धुमधुमला

β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : गुरुवार : दि. 23 नोव्हेंबर 2023
β⇔नाशिक , ता. 23 ( प्रतिनिधी : वैशाली महाले ) :- आई संतांची करा सेवा पंडित मित्रांचे प्रतिपादन शिवमहापुराण कथेला भाविकांची मांदियाळी महात्मा आणि परमात्मा म्हणजेच जन्म देती आई, गुरुजन तसेच साधुसंत यांची सेवा केली. त्यांचा नेहमीच सन्मान केल्यास खऱ्या अर्थाने जीवन यशस्वी होईल ,असे प्रतिपादन कथाकार भागवत भूषण पंडित प्रदीप मिश्रा यांनी केले. पाथर्डी गाव येथील शिवमहापुराण कथा सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी पंडित मिश्रा यांच्या अमोभवानीने भाविक तल्लीन झाले होते. यावेळी भगवान शंकरांच्या गजराने संपूर्ण परिसर धुमधुमला होता. पंडित मिश्रा म्हणाले, की केवळ व्रतवैकल्य केल्यानंतर माणूस पुण्य फळप्राप्तीची अपेक्षा करतो. परंतु व्रतवैकल्या सोबत केवळ शिवमहापुराण ऐकता माणसाने मेहनत करण्याची ताकदही ठेवली, तर तो जीवनात खऱ्या अर्थाने यशस्वी होतो.
β :नाशिक : ⇔ पाथर्डी गाव येथे शिवमहापुराण कथेला भाविकांची मांदियाळी, भगवान शंकरांच्या गजराने संपूर्ण परिसर धुमधुमला-( प्रतिनिधी : वैशाली महाले )
कोणत्याही देशाला नष्ट करायचे असेल तर सर्वप्रथम त्या देशाची संस्कृती आणि संस्कारांना नष्ट केले जाते. मात्र जेव्हापासून महादेवाच्या शिवलिंगावर जलाभिषेक करण्यास सुरुवात करण्यात आली, तेव्हापासून देशाचा धर्मही वाढण्यास सुरुवात झाली. यामुळे देशाची संस्कृती आणि संस्कार कधीही नष्ट होणार नाहीत . दिव्याची वात जशी सर्वत्र प्रकाश देऊन परिसर प्रकाशमय करीत असते. त्याचप्रमाणे 12 ज्योतिर्लिंगाचे महत्त्व एक समान आहेत. या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले असे जीवनात प्रकाश पडतो नाशिकच्या पवित्र भूमितच त्रंबकेश्वर येथे ब्रह्मा, विष्णू, महेश हे तिघेही एक संघ असल्याने बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले नाही, तरीही त्रंबकेश्वराच्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्यास खऱ्या अर्थाने जीवनाचे सार्थक होते. ज्या कुणाला अडथळे निर्माण होत असतील, अशा भाविकांनी आपल्या घराजवळ असलेल्या मंदिरातील शिवलिंगावर किमान तीन महिने जलाभिषेक करावा. त्यांचे अडथळे दूर होऊन भगवान महादेव यांच्या मनोकामना पूर्ण करतील ,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो. ८२०८१८०५१०