येडशीच्या विद्यार्थ्यांचेसोलापुर कुस्ती स्पर्धेतदणदणीत विजय
β : येडशी (धाराशिव) : ⇔ येडशीच्या विद्यार्थ्यांचे सोलापुर कुस्ती स्पर्धेत दणदणीत विजय – (प्रतिनिधी : सुभान शेख )
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : रविवार : दि 3 डिसेंबर 2023
β⇔येडशी (धाराशिव),ता.3 (प्रतिनिधी : सुभान शेख ) :- उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्याच्या धाराशिव तालुक्यातील येडशी येथील अष्टपैलू खेळाडू पैलवान विद्यार्थ्यांनी सोलापुर येथे पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेत नेत्र दीपक यश मिळवले आहे . सदर स्पर्धा वेगवेगळ्या गटात संपन्न झाल्या . या चुरशीच्या कुस्ती स्पर्धेत –१०० किलो वजनी गटात राहुल सुरेश शेळके- प्रथम क्रमांक, पटकावला आहे. ८६ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक – यश बालाजी देशमुख , ५५ किलो तृतीय क्रमांक – शुभम प्रताप ढोणे, ५४ किलो प्रथम क्रमांक – विजय विनोद पवार, २२ किलो प्रथम क्रमांक – स्वराज्य दिपक धोंगडे ,२०किलो द्वितीय क्रमांक – अभंग दिंगबर शेळके आदींनी जोरदार कामगिरी करत यश संपादन केले आहे ,ह्या स्पर्धा सोलापुर येथील सिंहगड कॉलेज येथे पार पडल्या . अष्टपैलू खेळ करत पैलवान विद्यार्थ्यांनी दणदणीत विजय मिळवला असून विजय विद्यार्थ्यांचे शिवनेरी तालीम संघ व ग्रामस्थांनातुन कौतुक केले जात आहे. अष्टपैलू विद्यार्थ्यांचे पुढील वाटचालीसाठी दिल्ली येथे होणाऱ्या नॅशनल कुस्ती स्पर्धेसाठी या सर्व विद्यार्थ्यांचे निवड करण्यात आली आहे. धाराशिव तालुक्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे .
🅱️ :नागपूर:⇔ गुढीपाडवा: संपूर्ण सृष्टीसाठी शुभ,समृद्ध, नवचैतन्य व मांगल्याचे प्रतीक-(प्रतिनिधी-रमेश लांजेवार)
4 days ago
🅱️ : सुरगाणा (नाशिक):⇔कोल्हापूर रंगभूमीवर विधिनाट्य महोत्सवात आदिवासी कला संस्कृतीचे दर्शन ! कलाप्रेमी रसिकांना आदीम संस्कृतीची भुरळ; हजारो प्रेक्षकांनी घेतला आनंद !-(प्रतिनिधी-रतन चौधरी)
7 days ago
🅱️: वणी (नाशिक):⇔वणी येथे पुणेगाव धरण्याचा डाव्या कालव्यात पडून शाळकरी आठ वर्षीय बालकांचा आकस्मिक मृत्यू-(प्रतिनिधी-सुरेश सुराशे )
7 days ago
🅱️: निफाड( नाशिक):⇔सेवानिवृत्त शिक्षकांची अंशराशीकरणाची १२ लाखापेक्षा अधिक रक्कमेचा अपहार;साखळी उपोषण तदनंतर आमरण उपोषण-(प्रतिनिधी-रावसाहेब जाधव)