प्रा. डॉ. भागवत शंकर महाले यांना “राज्यस्तरीय दर्पण रत्न पुरस्कार” जाहीर

image

              मलकापूर (जि. बुलढाणा)येथील  हिंदी-मराठी पत्रकार संघ व दर्पण वृत्तपत्राद्वारे सामाजिक उपक्रमाचा भाग म्हणून विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान व सत्कार करण्यासाठी “राज्यस्तरीय दर्पण रत्न पुरस्काराचे” आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पत्रकारिता, शिक्षण, साहित्य,सामाजिक, खेळ, राजकीय,सौंदर्य, डॉक्टर,वकील,महिला,सहकार,पतसंस्था,कला,इत्यादी क्षेत्रात विशेष कर्तृत्व घडवणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येणार आहे.
            सदर पुरस्कारामध्ये नाशिक जिल्यातील त्र्यंबकेश्वर येथील  मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय त्र्यंबकेश्वर येथे कार्यरत असलेले राज्यशास्त्र विभाग प्रमुख  प्रा. डॉ. भागवत शंकर महाले, सहयोगी प्राध्यापक  यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय विविध शैक्षणिक उपक्रम, संशोधन, पत्रकारिता क्षेत्रातील विशेष कार्य या कार्याबद्दल दाखल घेत त्यांना हिंदी-मराठी पत्रकार संघ द्वारा आयोजित राज्यस्तरीय दर्पणरत्न पुरस्कार- 2026′ या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांनी आतापर्यंत संशोधन क्षेत्रातील ४ पेटंट , 5 बुक पब्लिश केले , असून  उत्कृष्ठ शोध निबंध -2 पुरस्कार माजी अर्थ मंत्री जयंत पाटील यांच्या  हस्ते प्रदान करण्यात आले आहेत, असे एकूण  14 पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना  मंगळवार, दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी  मलकापूर (जि. बुलढाणा)  येथील “हिंदी-मराठी पत्रकार संघ द्वारा” आयोजित   ‘मराठा मंगल कार्यालय हॉल’ मलकापूर येथे  सदर पुरस्कार  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून मान्यवरांच्या हस्ते प्रा. डॉ. भागवत शंकर महाले यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सदर पुरस्कार जाहीर झाल्याने नाशिक जिल्हासह राज्यभरातून  मित्र परिवाराकडून  अभिनंदनाचा वर्षाव होत  आहे.


दिव्य भारत बीएसएम न्यूज :