दिव्य भारत बीएसएम न्यूज : दिनांक -02 जानेवारी 2025
शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी बाबुस ढगे तर उपाध्यक्षपदी सौ सविता ढगे यांची बिनविरोध निवड
मुदखेड (प्रतिनिधी : साहेबराव गागलवाड):-
तालुक्यातील मौजे महाटी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय व्यवस्थापन समिती पुनर्गठीत करण्यासाठी दि. ३० डिसेंबर रोजी पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत मोठ्या प्रमाणात पालक वर्ग उपस्थित होते.
बैठकीमध्ये सर्वानुमते बाबूस ढगे यांची अध्यक्ष म्हणून तर सौ सविता गोविंद ढगे यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली तर सदस्य म्हणून मेघा गागलवाड, रेणुका कोंकेवाड,अश्विनि पांचाळ,मिलिंद जाधव,नवनाथ ढगे, अनुसया ढगे, शिवाजी ढगे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आनंदराव ढगे यांची उच्चशिक्षित शिक्षणप्रेमी म्हणून निवड करण्यात आली शिक्षक प्रतिनिधी म्हणून सहशिक्षक बालाजी राठोड यांची निवड करण्यात आली तर विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून विराज ढगे व मयुरी ढवळे ची निवड करण्यात आली.
यावेळी शाळेचे मुअ भोसले यांनी प्रास्ताविकातून गुणवत्ता कशी वाढवता येईल याकडे माझे व माझ्या सहकार्यांचे प्रयत्न राहतील आम्हाला कुठे गाववाल्यांची मदत लागली तर आपण वेळ काढून आम्हाला सहकार्य करावे अशीही यावेळी त्यांनी सांगितले. नवनिर्वाचित अध्यक्ष यांनीही मी आपल्या शाळेला पुर्णपणे वेळ देऊन या शाळेत पटसंख्या वाढविण्याचे आश्वासन दिले. शिक्षणप्रेमी आनंदराव ढगे यांनीही आपल्या शाळेसाठी काय काय करता येईल याकडे लक्ष देऊन तालुक्यांत एक नंबर कशी येईल याकडे गाव वाल्यांना सोबत घेऊन आम्ही काम करणार अशी ग्वाही दिली.
बैठकीचे अध्यक्षस्थानी चेअरमन संभाजीराव ढगे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून गावचे सरपंच बळी ढगे, गावचे पोलीस पाटील आदिनाथ ढगे, पत्रकार साहेबराव गागलवाड यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचं सहशिक्षक शिरुकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सहशिक्षक राठोड यांनी मानले.
दिव्य भारत बीएसएम न्यूज : दिनांक -02 जानेवारी 2025

