गोखले एज्युकेशन सोसायटीचा १०८ वा वर्धापन दिन उत्साहात; अविनाश धर्माधिकारी यांनी मांडले भारतीय ज्ञानप्रणालीचे महत्त्व

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री. अविनाश धर्माधिकारी (माजी आयएएस अधिकारी व संस्थापक, चाणक्य मंडळ परिवार, पुणे) उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात भारतीय ज्ञानप्रणाली (Indian Knowledge System) ही आधुनिक शिक्षणव्यवस्थेची भक्कम पायाभरणी ठरावी, असा विचार मांडला.ते म्हणाले,“शिक्षण म्हणजे केवळ नोकरीपुरते मर्यादित नसून, ते ‘स्व’ची ओळख आहे –कोऽहम् ते सोऽहम्.” भारतीय परंपरेतून आलेल्या मूल्याधिष्ठित शिक्षणाची गरज अधोरेखित करत त्यांनी चरित्रनिर्मिती आणि राष्ट्रनिर्मिती यावर भर दिला.

धर्माधिकारी यांनी ‘नमस्ते’ या शब्दाचा अर्थ स्पष्ट करत सांगितले की,“माझ्यातील ईश्वरी चैतन्याला नमस्कार” ही भारतीय संस्कृतीची महानता आहे.भारतीय ज्ञानपरंपरा आणि आधुनिक STEM शिक्षण (Science, Technology, Engineering, Mathematics) यांची सांगड घालणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

या सोहळ्यात सर डॉ. एम. एस. गोसावी उत्कृष्टता पुरस्कार – २०२६ श्री. अविनाश धर्माधिकारी यांना प्रदान करण्यात आला.तसेच संस्थेसाठी दीर्घकाळ योगदान देणाऱ्या प्राचार्य पी. ए. राऊत यांना त्यांच्या ६० वर्षांच्या सेवेसाठी जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. दीप्ती देशपांडे (सचिव व खजिनदार) होत्या. त्यांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या कार्याचा गौरव करत सांगितले की,

या सर्व बाबी गोखले एज्युकेशन सोसायटीला देशातील अग्रगण्य संस्था बनवतात.

या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते, त्यामध्ये—

  • डॉ. राहुल फाटे (उद्योजक व लेखक)
  • डॉ. एस. व्ही. संत
  • डॉ. आर. पी. देशपांडे
  • पी. एम. देशपांडे
  • शैलेश गोसावी
  • अक्षय देशपांडे
  • अंजली कुलकर्णी
  • डॉ. राम कुलकर्णी
  • प्रभाकर राऊत

आदींचा समावेश होता.

या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे संस्थेच्या शैक्षणिक व वैचारिक योगदानातून प्रकाशित झालेल्या सहा ग्रंथांचे प्रकाशन

  • ‘गॅलंट’
  • ‘झेनिथ’
  • ‘स्वयंपरेणा’
  • ‘स्वयंपप्रकाश’
  • ‘स्पेक्ट्रम’
  • ‘रेझोनन्स’

यामुळे शिक्षण क्षेत्रातील संस्थेचा वैचारिक ठसा अधिक ठळक झाला.

कार्यक्रमात पुढील पुरस्कार प्रदान करण्यात आले—

  • डॉ. एम. आर. मेश्राम
  • डॉ. हेमा बुरुंग
  • अशोक भोईर
  • डी. एन. चौधरी
  • हेमंत ठाकूर
  • ज्योत्स्ना दिघे
  • मोहिनीराज जोशी
  • विनोद पाटील
  • आशा पडते
  • उमेश दवते
  • जे. डी. सी. बिटको IMSR
  • ‘अंतर-अग्नी’ महाविद्यालयीन मासिक
  • प्रा. विनोद देशपांडे

आर. एच. सपट महाविद्यालयाला ५ स्टार गुणवत्ता उत्कृष्टता पुरस्कार, तसेच एस. पी. एच. हायस्कूलचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मुग्धा जोशीडॉ. स्नेहा रत्नपारखी यांनी केले.
आभार प्रदर्शन डॉ. राम कुलकर्णी यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्या डॉ. लीना भट, डॉ. खंडेलवाल व सर्व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या १०८ व्या वर्धापन दिन सोहळ्याने एक संदेश दिला—

“मूल्याधिष्ठित शिक्षण, भारतीय ज्ञानपरंपरा आणि आधुनिकतेची सांगड घालूनच राष्ट्रनिर्मिती शक्य आहे.”

हा सोहळा प्रेरणा, संस्कार आणि शिक्षणाचा जागर ठरला.