Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनब्रेकिंगमहाराष्ट्र

β : त्र्यंबकेश्वर :⇔ “विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच  “युवास्पंदन ” कार्यक्रमाचा उद्देश असून स्पर्धेकडे विद्यार्थ्यांनी करियर म्हणून बघावे.”- मविप्र शिक्षणाधिकारी : डाॅ.नितीन जाधव

β : त्र्यंबकेश्वर :⇔ "विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच  "युवास्पंदन " कार्यक्रमाचा उद्देश असून स्पर्धेकडे विद्यार्थ्यांनी करियर म्हणून बघावे."- मविप्र शिक्षणाधिकारी : डाॅ.नितीन जाधव

0 1 2 9 1 1

“विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच  “युवास्पंदन ” कार्यक्रमाचा उद्देश असून स्पर्धेकडे विद्यार्थ्यांनी करियर म्हणून बघावे आणि स्वतःला सिद्ध करावे.”–  मविप्र संस्थेचे शिक्षणाधिकारी : डाॅ.नितीन जाधव

β : त्र्यंबकेश्वर :⇔ "विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच  "युवास्पंदन " कार्यक्रमाचा उद्देश असून स्पर्धेकडे विद्यार्थ्यांनी करियर म्हणून बघावे आणि स्वतःला सिद्ध करावे."-  मविप्र संस्थेचे शिक्षणाधिकारी : डाॅ.नितीन जाधव
β : त्र्यंबकेश्वर :⇔ “विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच  “युवास्पंदन ” कार्यक्रमाचा उद्देश असून स्पर्धेकडे विद्यार्थ्यांनी करियर म्हणून बघावे आणि स्वतःला सिद्ध करावे.”-  मविप्र संस्थेचे शिक्षणाधिकारी : डाॅ.नितीन जाधव

त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात युवास्पंदन  स्पर्धा  उद्घाटन  संपन्न

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिकसोमवार  : दि, 29 जानेवारी 2024

β⇔,त्र्यंबकेश्वर , दि.29 (प्रतिनिधी: प्रा.समाधान गांगुर्डे ) :-  मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय त्र्यंबकेश्वर येथे मविप्र संस्थेच्या “युवास्पंदन स्पर्धा २०२४” तालुकास्तरीय विविध स्पर्धांचे उदघाटन संस्थेचे शिक्षणाधिकारी डाॅ.नितीन जाधव यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले. दोन दिवशीय यास्पर्धांमध्ये संगीत,साहित्य,ललित,नाट्य,नृत्य,गायन इ.कला प्रकारांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने भारतीय व पाश्चात्य गायन, लोकवाद्य, वक्तृत्व,वादविवाद,पोस्टर डिझाईन,रांगोळी,फोटोग्राफी,मेहंदी, एकांकिका इ. कलांचा समावेश करण्यात आला. त्र्यंबकेश्वर , सातपूर , गिरणारे या महाविद्यालयातील संघांनी सहभाग नोंदविला आहे.सदर स्पर्धेचे प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणून संस्थेचे शिक्षणाधिकारी डाॅ.नितीन जाधव, प्रमुख अतिथी युवास्पंदन सल्लागार प्रा.राजाराम मुंगसे, समन्वयक डाॅ.तुषार पाटील हे होते.
β : त्र्यंबकेश्वर :⇔ "विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच  "युवास्पंदन " कार्यक्रमाचा उद्देश असून स्पर्धेकडे विद्यार्थ्यांनी करियर म्हणून बघावे आणि स्वतःला सिद्ध करावे."-  मविप्र संस्थेचे शिक्षणाधिकारी : डाॅ.नितीन जाधव
β : त्र्यंबकेश्वर :⇔ “विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच  “युवास्पंदन ” कार्यक्रमाचा उद्देश असून स्पर्धेकडे विद्यार्थ्यांनी करियर म्हणून बघावे आणि स्वतःला सिद्ध करावे.”-  मविप्र संस्थेचे शिक्षणाधिकारी : डाॅ.नितीन जाधव
            याप्रसंगी उद्घाटक डॉ. नितीन जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना “यश मिळवण्यासाठी कोणत्याही शॉर्टकट मार्गाचा वापर विद्यार्थ्यांनी न करता परिश्रम करून यश संपादन करावे. विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन सांस्कृतिक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांनी आपला ठसा उमटवावा. काळाबरोबर चालण्यासाठी पुस्तकी ज्ञानावर न थांबता इतरही क्षेत्रातील ज्ञान आत्मसात करावे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच या कार्यक्रमाचा उद्देश असून स्पर्धेकडे विद्यार्थ्यांनी करियर म्हणून बघावे आणि स्वतःला सिद्ध करावे.” असे प्रतिपादन केले.
β : त्र्यंबकेश्वर :⇔ "विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच  "युवास्पंदन " कार्यक्रमाचा उद्देश असून स्पर्धेकडे विद्यार्थ्यांनी करियर म्हणून बघावे आणि स्वतःला सिद्ध करावे."-  मविप्र संस्थेचे शिक्षणाधिकारी : डाॅ.नितीन जाधव
β : त्र्यंबकेश्वर :⇔ (“खुल्ली   ग्रंथपेटी :   महाविद्यालय परिसरात  विद्यार्थ्यांना  मोकळया  वेळेत पुस्तक वाचन  करतात- वाचन कट्टा  . .”-  मविप्र संस्थेचे शिक्षणाधिकारी : डाॅ.नितीन जाधव , प्राचार्य  डॉ दिलीप पवार , प्रा राजाराम मुंगसे , प्रा डॉ तुषार पाटील , प्रा .डॉ भागवत महाले ,आदि दिसत आहेत.  )     
         या प्रसंगी प्रमुख अतिथी प्रा.राजाराम मुंगसे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत विद्यार्थ्यांना ज्ञान आणि कलेच्या माध्यमातून आपले जीवन कसे फुलवायचे व अपयशाला न घाबरता पुन्हा उभे रहावे या विषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. दिलीप पवार यांनी भूषविले. आपल्या अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थ्यांना संबोधित करताना ,” या स्पर्धा युवकांच्या विचारांना,स्वप्न व ध्येयांना वाव देणारा उपक्रम आहे. युवा म्हणजे चैतन्याचे झाड,कुटुंब व राष्ट्राचा जागता पहारा,आशेचा किनारा होय.युवकांकडून कुटुंब , राष्ट्राच्या उत्कर्षाच्या बाबतीत मोठ्या अपेक्षा असतात. स्पर्धांचा उद्देश हा विद्यार्थ्यांमधील दडलेला दडलेल्या राजहंसाला वाट मोकळी करून देणे हा आहे. या स्पर्धा स्वतःला सिद्ध करण्याची संधी असून कलाविष्कार हा माणसाला सदैव उच्च ध्येयाकडे वाटचाल करण्यास प्रोत्साहित करतो.व्यक्तित्वाला कलेच्या माध्यमातून आकार मिळतो. कलेचा संबंध मानवी जीवनाशी जोडलेला असल्यामुळे कलेचे संवर्धन व जतन आपण केलेच पाहिजे” असे मत व्यक्त केले. 
    युवस्पादन स्पर्धा उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय भाषण करतांना प्राचार्य डॉ दिलीप पवार

β : त्र्यंबकेश्वर : युवस्पादन स्पर्धा उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय भाषण करतांना प्राचार्य डॉ दिलीप पवार

                            कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. सुलक्षणा कोळी यांनी केले.प्रमुख अतिथींचा परिचय प्रा. उत्तम सांगळे यांनी करुन दिला. कार्यक्रमासाठी प्रो.डॉ. संदीप निकम प्रा.समाधान गांगुर्डे प्रा.संदीप गोसावी डॉ.भागवत महाले प्रा.प्रशांत रणसुरे प्रा. मनोहर जोपळे, प्रा.प्रणील जगदाळे प्रा.ललिता सोनवणे, प्रा.विष्णू दिघे, प्रा.आशुतोष खाडे, श्री.रवींद्र मालुंजकर व इतर सर्व प्राध्यापक,अन्य महाविद्यालयाचे प्रतिनिधी व कर्मचारी उपस्थित होते.सूत्रसंचालन निता पुणतांबेकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार डाॅ. राजेश झनकर यांनी मानले.

 β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले:  मो 8208180510

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!