





बिटको महाविद्यालयात गीत गायन व नृत्य स्पर्धा उत्साहात संपन्न….


β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : रविवार : दि, 1 फेब्रुवारी 2024
β⇔नाशिकरोड, दि.1 ( प्रतिनिधी : संजय परमसागर ) :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिक रोड येथील बिटको महाविद्यालयात ‘ सीबीसी नासिकरोड फेस्ट ‘ वार्षिक स्नेहसंमेलनात दि.१ फेब्रुवारी रोजी गीतगायन व नृत्य स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धांमध्ये एकूण ५२ विद्यार्थ्यांचा शानदार परफॉर्मन्स उपस्थितांसमोर सादर झाला.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते ‘नटराज पूजन’ व ‘सरस्वती पूजन’ करण्यात आले.महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ.अनिलकुमार पठारे, समन्वयक डॉ. के. सी. टकले, डॉ. आकाश ठाकूर, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सुनिता नेमाडे, पर्यवेक्षिका प्रणाली पाथरे, जयराम हायस्कूलचे मुख्याध्यापक जे. एन. अहिरे, जेडीसी बिटको हायस्कूलचे श्री उदमाले, विद्यार्थी सभा कार्याध्यक्ष लक्ष्मण शेंडगे, सुहास माळवे, स्पर्धाप्रमुख डॉ.शशिकांत साबळे, डॉ. कृष्णा शहाणे, नितीन पाटील, संजय परमसागर, विशाल माने, संतोष पगार आदी उपस्थित होते. गीतगायन स्पर्धेचे परीक्षण संतोष जोंधळे व अनुराग रत्नपारखी यांनी केले तर नृत्य स्पर्धेचे परीक्षण सुरज काकडा व अस्थाना मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ उत्तम करमाळकर यांनी केले ,तर आभार प्रा. लक्ष्मण शेंडगे यांनी मानले.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो 8208180510