आशागड येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न

दिव्य भारत बी एस एम न्यूज : सोमवार , दिनांक : १६ मार्च २०२६
डहाणू, (प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके ):- दि. १४ मार्च : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा-१’ अंतर्गत आज डहाणू तहसील कार्यालय अंतर्गत

आशागड येथे महसूल समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाला आमदार विनोद निकोले यांची प्रमुख उपस्थिती लाभली तसेच आशागड सरपंच दीलपेश दौडा ,आसवे सरपंच विष्णू गूरोडा,डेहणे सरपंच दत्तात्रय भोंडवा,सोगवे सरपंच सौ लहाणी दौडा तसेच सूत्रसंचालक आणि विविध तालुका विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यावेळी नागरिकांच्या महसूल व इतर शासकीय सेवांशी संबंधित प्रश्नांचा तात्काळ निपटारा करण्यावर भर देण्यात आला.
शिबिरामध्ये नागरिकांना ७/१२ उतारे, ८-अ उतारे ,तसेच विविध दाखले यांचे वितरण करण्यात आले. याशिवाय ७/१२ अद्यावत करणे, ई-मोजणी, पाणंद रस्त्यांबाबत कार्यवाही, अभिलेख दुरुस्ती हेल्पडेस्क, अकृषिक सुधारणा मार्गदर्शन, पीएम किसान योजना, दुय्यम शिधापत्रिका वाटप, प्रलंबित फेरफार निकाली काढणे, तुकडेबंदी कायद्याअंतर्गत कार्यवाही, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचा लाभ, आरोग्य तपासणी, मोफत डिजिटल सातबारा, वनपट्ट्यावर सातबारा नावे नोंद करणे, लक्ष्मी मुक्ती योजना, प्रॉपर्टी कार्ड आदी विविध सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या.
या शिबिराच्या माध्यमातून महसूल विभागाशी संबंधित अनेक प्रलंबित कामांचा जलदगतीने निपटारा होत असून शासनाच्या “Single Day Service Delivery” उपक्रमामुळे नागरिकांना शासकीय सेवा सुलभ व पारदर्शक पद्धतीने मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. शासनाचा हा उपक्रम सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.हा कार्यक्रम डहाणू तालूक्याचे तहसीलदार मा सूनिल कोळी, यांनी यशस्वी रित्या पार पाडून, डहाणू तालूका महसूल विभागाच्या नायब तहसीलदार सिमा पूजारा, डहाणू च्या निवासी नायब तहसीलदा लिना पाटील,मंडळ अधिकारी आत्माराम घरत , डहाणू पूरवठा अधिकारी अर्जुन गावित,पूरवठा निरिक्षक प्रनाली बेडसे, अव्वल कारकून मा. वैभव पाटील,व ईतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थीत राहून जनतेने महाराजस्व शिबीराचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.
दिव्य भारत बी एस एम न्यूज : सोमवार , दिनांक : १६ मार्च २०२६

