द्वारकाधीश साखर कारखान्याकडून अध्ययावत जल शुद्धीकरण यंत्र न्यू इंग्लिश स्कूल शाळेला भेट
दिव्य भारत बीएसएम न्यूज : गुरुवार :दिनांक : 9 एप्रिल 2026
ताहाराबाद, (प्रतिनिधी अरुणकुमार भामरे):-
विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व्हावा यासाठी द्वारकाधीश साखर कारखान्याकडून वेळोवेळी सहकार्य केले जाणार असून विद्यार्थ्यांनीही जिद्द, मेहनतीने शैक्षणिक प्रगती करून मोठ्या पदावर गेल्यानंतर महाराष्ट्रातील नामवंत मविप्र शिक्षण संस्थेचा विविध माध्यमातून विकास करावा असे प्रतिपादन द्वारकाधीश साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक तसेच नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक सचिन शंकराव सावंत यांनी केले.

ताहाराबाद( ता. बागलाण) येथील न्यू इंग्लिश स्कूल या शाळेला द्वारकाधीश साखर कारखान्याच्या सीआरएस फंडातून एक लाख ७५ हजार रुपये किमतीचे अध्ययावत जल शुद्धीकरण यंत्र भेट देण्यात आले याप्रसंगी सावंत बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्षपदी संचालक डॉक्टर प्रसाद सोनवणे प्रमुख पाहुणे चिटणीस दिलीप भाऊसा दळवी, शालेय समिती अध्यक्ष डॉ प्रशांत सोनवणे, सोसायटीचे सभापती के. पी. जाधव, कारखान्याचे अधिकारी शिवाजी भालेराव ,बाळासाहेब करपे, भूषण नांद्रे, विजय पगार, उच्च माध्यमिक समितीचे अध्यक्ष विलास निकम, प्रभाकर पाटील, नारायण चौधरी, बाळासाहेब महाजन, डॉ. डी. एस. महाजन, निलेश कांकरिया, दीपक कांकरिया, मिलिंद चित्ते ,बाबा नंदन ,सुनील नंदन ,सुरेश महाजन, साहेबराव पगार, भाऊसाहेब नांद्रे, महेंद्र भामरे, सुनील गवळी ,राजेंद्र साळवे, किरण गांगुर्डे, मोहन महाजन, निखिल कासारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्राचार्य दीपक डावरे यांनी प्रास्ताविक करून आवारातील छत्रपती शिवाजी महाराज व सरस्वती यांच्या पुतळ्याचे पूजन व जलशुद्धीकरण यंत्राचे सचिन सावंत, डॉ. प्रसाद सोनवणे, दिलीप दळवी यांच्या हस्ते नारळ अर्पण करून जलशुद्धीकरण यंत्र विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आले.

यावेळी सचिन सावंत यांनी सांगितले की, बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद वाक्य अंगीकारून कर्मवीरांनी शंभर वर्षांपूर्वी मविप्र या समाज संस्थेचे रोपटे लावले असून आज ही शैक्षणिक संस्था महाराष्ट्रात प्रगती पथावर आहे. आजपर्यंत संस्थेतील असंख्य विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगती करून पुढे मोठ्या पदावर गेल्यानंतर माजी विद्यार्थी म्हणून संस्थेसाठी वेळोवेळी योगदान देत असल्याने अभिमानाची बाब आहे असे सांगितले. संचालक डॉ. प्रसाद सोनवणे यांनी सांगितले की कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव सावंत यांनी द्वारकाधीश साखर कारखान्याची या परिसरात निर्मिती केल्यामुळे हजारो सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळाला असून कारखान्यामुळे या परिसराचा विकास होऊन आज महाराष्ट्रातील नामवंत साखर कारखाना म्हणून भारतात या साखर कारखान्याची ओळख आहे असल्याने बागलाण वासियांसाठी अभिमानास्पद बाब आहे असे सांगितले.

यावेळी चिटणीस दळवी, संचालक डॉ. सोनवणे यांच्या हस्ते सावंत यांनी शाळेला जलशुद्धीकरण यंत्र भेट दिल्यामुळे स्मृतीचिन्ह व सरचिटणीस नितीन ठाकरे यांच्या स्वाक्षरीचे आभार पत्र देऊन सन्मान करण्यात आला.उप मुख्याध्यापिका रोहिणी सोनवणे, सूचित देवरे ,राहुल पगार ,ए.डी. गोसावी, के.जी अहिरे शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के.जी. अहिरे यांनी करून आभार ए.डी. गोसावी यांनी मानले.

द्वारकाधीश साखर कारखान्याचे संस्थापक, अध्यक्ष शंकरराव सावंत, उपाध्यक्ष चंद्रकला सावंत, संचालक कैलास सावंत, कार्यकारी संचालक सचिन सावंत यांनी कारखान्याच्या सी आर एस फंडातून ताहाराबाद गाव व परिसरातील रुग्णांची गैरसोय होणारी यासाठी ताहाराबाद ग्रामपंचायतला रुग्णवाहिका, शेवरे ग्रामपंचायतला पिण्याचे पाण्याचे टँकर, दिले असून अंतापुर, करंजाड ,पिंपळकोठे, सोमपूर, ताहाराबाद, नामपुर, लोहणेनेर इत्यादी गावात सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
दिव्य भारत बीएसएम न्यूज
प्रतिनिधी अरुणकुमार भामरे
