दिव्य भारत बी एस एम न्यूज : मंगळवार : दिनांक : २९ एप्रिल २०२६

वैशाली दामले यांना पीएचडी पदवी प्रदान
नाशिक, (प्रतिनिधी : डॉ. भागवत महाले ):- मविप्र समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय त्र्यंबकेश्वर येथील हिंदी विभागातील श्रीमती दामले वैशाली दगू यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत ” मिथिलेश्वर तथा राजन गवस के उपन्यासों में अभिव्यक्त ग्रामीण जीवन का तुलनात्मक अध्ययन ” या विषयात प्रबंध सादर केला होता. त्यांची मौखिक परीक्षाद्वारे तज्ञ मार्गदर्शकांनी मुल्यांकन करून पीएच.डी पदवी प्रदान केली. त्यांच्या संशोधनकार्यासाठी मार्गदर्शक म्हणून केटीएचएम महाविद्यालयातील डॉ. जगदीश परदेशी सर यांनी मार्गदर्शन केले. तर हिंदी विभागप्रमुख डॉ. भंवर मॅडम यांचेही मार्गदर्शन लाभले, केटीएचएम महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो.डॉ. कल्पना एम. आहिरे मॅडम यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. याशिवाय त्र्यंबकेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोपान कुशारे सर यांचे संशोधन प्रक्रियेदरम्यान महत्वपूर्ण सहकार्य मिळाले. महाविद्यालयातील डॉ. प्रशांत रणसुरे , डॉ.भागवत महाले , डॉ. निलेश मरसाळे , प्रा.मनोज मगर , डॉ. शाश्वती निरभवने, डॉ. वैशाली जाधव, डॉ . श्वेताली सोनावणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. डॉ. वैशाली दगु दामले यांच्या यशामुळे कुटुंबीय, मित्र परिवार यांच्याकडून कौतुक होत असून अभिनंदन केले आहे.

दिव्य भारत बी एस एम न्यूज : मंगळवार : दिनांक : २९ एप्रिल २०२६
