येडशी येथे नलावडे यांच्या उपस्थितीत रस्ता रोको व बेमुदत ठिय्या आंदोलन संपन्न

दिव्य भारत बीएसएम न्यूज : गुरुवार:दिनांक:०७ मे २०२६
येडशी – दिं-7(प्रतिनिधी : सुभान शेख ):- धाराशिव तालुक्यातील येडशी येथील दिं4 मे 2026 सोमवार रोजी रस्ता रोको व बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यासाठी येडशी ग्रामपंचायत माजी उपसरपंच तथा शिवसेना(उ.बा.ठा.) गटाचे नेते – गजानन(भैय्या) नलावडे यांनी येडशी मधील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी निवेदनात देण्यात आलेल्या निवेदनात प्रमुख मागण्या करण्यात आलेल्या धाराशिव येथे जिल्हा अधिकारी कार्यालय , तहसीलदार साहेब , तहसील कार्यालय , पंचायत समिती – गटविकास अधिकारी कार्यालय , धाराशिव जिल्हा परिषद , पोलीस अधिक्षक कार्यालय , धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे , ग्रामपंचायत कार्यालय येडशी इत्यादी ठिकाणी निवेदन देण्यात आले होते. या निवेदनात प्रमुख तीन मागण्या करण्यात आल्या होते की ,

1) येडशी गावाला कायमस्वरूपी पाणी मिळणे बाबत .
2) गॅस दरवाढ कमी करून सुरळीत गॅस पुरवठा करावा.
3) पेट्रोल – डिझेल दरवाढ थांबवुन , सुरळीत पुरवठा करावा.
असे निवेदनात लिहिले होते. तसेच , आज दिं – 7 मे गुरुवार रोजी सकाळी ठीक 10.00 वाजता शिवसेना(उ.बा.ठा.) गटाचे नेते – गजानन नलावडे यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीराजे महाराज चौकात कार्यकर्ते ना एकत्र घेऊन , सुरुवातीला छत्रपती संभाजीराजे महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून , मोठमोठ्या घोषणाबाजी करुन , या चौकात व्यावस्थित वाहनेचे रांगा लावून , शांततेत रस्ता रोको व बेमुदत ठिय्या आंदोलन ला सुरुवात करण्यात आला. या आंदोलनात सहभागी असलेले – मुकुंद(अप्पा)सस्ते , येडशी ग्रामपंचायत माजी उपसरपंच तथा शिवसेना(उ.बा.ठा ) गटाचे नेते – गजानन नलावडे , धाराशिव जिल्हा उप अध्यक्ष – अमोल पवार , विभाग प्रमुख – अशोकराव देशमुख , युवासेना तालुका उपप्रमुख – मच्छिंद्र पवार , युवासेना तालुका सचिव – सचिन चंदु ईटकर , कार्यकर्ते – भारत पवार , बाळासाहेब(बप्पा) पवार , गणेश पवार , बालाजी नागटिळक , भारत पवार , पांडुरंग लगाडे , या आंदोलनात सहभागी होऊन , रस्ता रोको व बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात आला. हा आंदोलन तब्बल अडीच तास सुरळीत पणे चालु ठेवण्यात आला. तसेच या आंदोलनाला येडशी मधील वंचित बहुजन युवक आघाडी ने पाठींबा देण्यात आला. या वेळी पाठिंबा देत असताना , उपस्थित असलेले – वंचित बहुजन युवक आघाडीचे धाराशिव तालुका प्रवक्त – सागर चंदनशिवे , वंचित बहुजन बहुजन आघाडी चे युवक आघाडी – माजी फारुखभाई शिकलगार , ग्रामपंचायत माजी सदस्य – पंकज शिंदे , विकी शिंदे , मार्गदर्शक – विशाल शिंदे ,
पदाधिकारी – घनश्याम भिसे , राज कांबळे , नितीन होवाळ , विकास सावंत , महिला – वंदना जानराव इत्यादींने पाठिंबा दिले.
या आंदोलनात येडशी गावातील पत्रकार बांधव तसेच आयबीएन लोकमत 18 टिव्ही चॅनल चे बालाजी निरफळ या आंदोलनाची माहिती घेण्यासाठी उपस्थित होते. तसेच , या आंदोलनात घोषणाबाजी केल्यानंतर , आंदोलन संपन्न करण्यासाठी उपस्थित असलेले – प्रशासन अधिकारी – धाराशिव पंचायत समिती गटविकास अधिकारी – संतोष नलावडे , पाणी पुरवठा विभागाचे जल उप अभियंता – जाधव , स्वप्नील सुळे , मंडळ अधिकारी – दिपाली मुळुक , तसेच , धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे पोलीस प्रशासनांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. तसेच , या आंदोलनात मागण्या केलेले येडशी मधील सर्व जनतेचे सर्वात मोठे पिण्याचे पाणीचे प्रशासनाने प्रश्न नाही सोडविले तर , सोलापुर ते छत्रपती संभाजी नगर हायवे रोड वरील बसुन तीव्र पद्धतीने आंदोलन करण्यात येईल.असे आवाहन गजानन नलावडे यांनी हाक दिली आहे.


दिव्य भारत बीएसएम न्यूज : गुरुवार:दिनांक:०७ मे २०२६
