दिव्य भारत बीएसएम न्यूज : शनिवार ,दिनांक १ ऑगस्ट 2026

नाशिकमध्ये वसंतराव नाईक जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थी, अधिकारी-कर्मचाऱ्यांचा भव्य सत्कार सोहळा
नाशिक, प्रतिनिधी : हरित क्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतरावजी नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त वसंतरावजी नाईक अधिकारी-कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य, जिल्हा शाखा नाशिक यांच्या वतीने रविवार, दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी गुणवंत विद्यार्थी, नव्याने शासकीय सेवेत दाखल झालेले कर्मचारी, सेवेत उल्लेखनीय कार्य करणारे अधिकारी-कर्मचारी तसेच सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून मा. चव्हाण साहेब, अप्पर आयुक्त (आदिवासी विकास विभाग, नाशिक) उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
दहावी, बारावी, डिप्लोमा, इंजिनिअरिंग, मेडिकल, NEET, JEE, MHT-CET आदी परीक्षांमध्ये प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच पोलीस, तलाठी व इतर शासकीय सेवेत निवड झालेल्या नव्या कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र, ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात येणार आहे. कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचाही यावेळी गौरव होणार आहे.हा कार्यक्रम रविवार, दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी २.०० या वेळेत रोटरी क्लब हॉल, जैन मंदिर शेजारी, गंजमाळ, नाशिक येथे आयोजित करण्यात आला असून, कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. लक्ष्मण रेवा राठोड व जिल्हा सचिव श्री. अशोक रूपसिंग चव्हाण यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे गुणपत्रक श्री. संजय चव्हाण जिल्हा प्रसिद्धीप्रमुख यांना 9881329775 या नंबरवर पाठवून पालकांसह कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच ही निमंत्रण पत्रिका समजून सर्वांनी कुटुंबासह उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
दिव्य भारत बीएसएम न्यूज : शनिवार ,दिनांक १ ऑगस्ट 2026
