दिव्य भारत बीएसएम न्यूज : मंगळवार , दिनांक : 1 सप्टेंबर 2026


प्रा. सुरेश भोये यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची विद्यावाचस्पती (Ph.D.) पदवी प्रदान
सुरगाणा : (प्रतिनिधी : प्रोफे. डॉ. भागवत महाले):- महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सुरगाणा येथील राज्यशास्त्र विभागातील प्राध्यापक सुरेश मुरलीधर भोये यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची विद्यावाचस्पती (Ph.D.) पदवी प्राप्त झाली आहे. प्रा. सुरेश भोये यांनी मानवविज्ञान शाखेअंतर्गत राज्यशास्त्र व लोकप्रशासन विषयात “दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील आदिवासी लोकांच्या मतदार वर्तनाचा अभ्यास” या विषयावर आपला शोधप्रबंध सादर केला होता. त्यांचे हे संशोधनकार्य पेमराज सारडा महाविद्यालय, अहिल्यानगर (संशोधन केंद्र) येथून पूर्ण झाले.
ऑनलाइन माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या मौखिक परीक्षेच्या (Viva-Voce) अध्यक्षस्थानी प्रोफे. (डॉ.) पांडुरंग भोये (अध्यक्ष, राज्यशास्त्र व लोकप्रशासन विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे) हे होते. तसेच बहिःस्थ पर्यवेक्षक म्हणून प्रोफे. (डॉ.) प्रशांत अमृतकर (कुलसचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर) यांची प्रमुख उपस्थिती होती.त्यांच्या या संशोधनाला मार्गदर्शक व संशोधन केंद्रप्रमुख डॉ. ज्योती पी. बीडलान तसेच सह-मार्गदर्शक डॉ. विलास डी. आवारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. मान्यवरांच्या उपस्थितीत संशोधनकार्याचे यशस्वी मूल्यमापन करून त्यांना ही पदवी प्रदान करण्यात आली. प्रा. सुरेश भोये यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक यशाबद्दल प्रोफे. डॉ. भागवत महाले (राज्यशास्त्र विभाग प्रमुख , कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, त्र्यंबकेश्वर) आणि प्रा. रमेश निकम (राज्यशास्त्र विभाग प्रमुख देवळाली कॅम्प ,नाशिक) यांनी त्यांचे शाल ,पुष्पगुच्छ देवून हार्दिक अभिनंदन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत दिघावकर, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच फोन करून पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

दिव्य भारत बीएसएम न्यूज : मंगळवार , दिनांक : 1 सप्टेंबर 2026
