दिव्य भारत बीएसएम न्यूज : सोमवार , दिनांक 26 ऑक्टोबर 2026
डॉ. सुरेश भोये यांना लोकमत समुहाचा गुरुकुल गुरूवर्य पुरस्कार प्रदान


सुरगाणा (शहर ) 🙁प्रतिनिधी प्रा. सुभाष कामडी):-
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सुरगाणा येथील राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.सुरेश भोये यांना लोकमत वर्तमानपत्र परिवार नाशिक आयोजित करण्यात आलेल्या गुरूकुल गुरूवर्य पुरस्कार २०२६ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाला श्रीकांत शुक्ला (सेक्रेटरी अशोका एज्युकेशन) डॉ.मीनल मोहगावकर ( कुलगुरू एस एम बी टी ) जेष्ठ अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व पुष्परोप देऊन सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल महात्मा गांधी विद्यामंदिर शिक्षणसंस्था पदाधिकारी, संस्थेचे उपाध्यक्ष तथा महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष डॉ. हरिष आडके यांनी अभिनंदन केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत दिघावकर, उपप्राचार्य डॉ.विनायक बागुल, कार्यालयीन अधीक्षक देविदास बागुल, डॉ. चंद्रकांत पाटील, प्रा. विजय अहिरे,प्रा. कविता भोये, प्रा. बाळू धुम, प्रा. सुभाष कामडी,प्रा. श्रीमती राधा चव्हाण आणि महाविद्यालयीन परिवार तसेच सुरगाणा तालुक्यातील सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

दिव्य भारत बीएसएम न्यूज : सोमवार , दिनांक 26 ऑक्टोबर 2026
