आरोग्य व शिक्षणई-पेपरब्रेकिंगमहाराष्ट्रसाहित्यिक
β : नवीन नाशिक :⇔प्रा. वैशाली क्षीरसागर यांना राज्यस्तरीय “आदर्श प्राध्यापक पुरस्कार” प्रदान-(प्रतिनिधी : डॉ. कृष्णा शहाणे)
β : नवीन नाशिक :⇔प्रा. वैशाली क्षीरसागर यांना राज्यस्तरीय "आदर्श प्राध्यापक पुरस्कार" प्रदान-(प्रतिनिधी : डॉ. कृष्णा शहाणे)
0
1
2
3
6
4
प्रा. वैशाली क्षीरसागर यांना राज्यस्तरीय “आदर्श प्राध्यापक पुरस्कार” प्रदान
β ⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार : दि 7 सप्टेंबर 2024
β⇔नवीन नाशिक,दि.7 (प्रतिनिधी : प्रा डॉ. कृष्णा शहाणे ) :- श्री. कालिका देवी मंदिर ट्रस्ट नाशिक यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श प्राध्यापक पुरस्कार के.टी.एच .एम. महाविद्यालयातील प्रा. वैशाली क्षीरसागर यांना नाशिकचे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांचे हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी सुभाष तळाजिया, अशोक दुधारे, आनंद खरे, राम पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी म्हणून त्यांनी अनेक सामाजिक कामे केलेली आहेत. त्यात वृक्षारोपण, रक्तदान शिबिराचे आयोजन, विशेष हिवाळी शिबिर, विविध सामाजिक, अंधश्रद्धा निर्मूलन अशा विषयांवर व्याख्यानांचे आयोजन केलेले असून त्यांनी अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील चर्चासत्रात आपले शोध निबंध सादर केलेले आहेत.
सन 2021 पासून के. टी.एच. एम. महाविद्यालय एस. डी. ओ. अधिकारी म्हणून कार्यरत असून पुणे विद्यापीठाच्या क्षेत्रात सर्वाधिक कार्यक्रम के.टी.एच.एम.महाविद्यालयात आयोजित केले. तसेच त्यांनी सांस्कृतिक कला मंडळ सदस्य, युवा स्पंदन, स्वर रंग यासारख्या कार्यक्रमातून भरीव कामगिरी बजावली आहे.
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो . ८२०८१८०५१०
0
1
2
3
6
4