0
1
5
5
3
7
एसनपीटी इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी ‘आगास २०२३-२४’ कार्यक्रम उत्साहात साजरा !!!
β⇒दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार : दि. 14 ऑक्टोबर 2023
β⇒ नाशिक,(पंचवटी) ता.13 ( प्रतिनिधी : अमोल चव्हाण ) :- श्री.पंचवटी एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती नर्मदाबेन पोपटलाल ठक्कर इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात दि. १४ ऑक्टोबर रोजी फ्रेशर्स पार्टी आगास २०२३-२४ चा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. प्रथम वर्ष बी. फार्मसी आणि डी. फार्मसी वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकरिता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमास संस्थेचे कार्यालय सचिव देवेंद्रभाई पटेल, सहसचिव – अभयभाई चोकसी,फार्मसी महाविद्यालयाचे सचिव -राजेशभाई ठक्कर, संस्थेचे सभासद विनोदभाई पटेल उपस्थित होते. मान्यवरांचे सरस्वती पुजनानंतर स्वागत विद्यार्थ्यांनी पुष्प देऊन केले. अभयभाई चोकसीयांनी उपस्थित विद्यार्थी वर्गाला त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विशाल गुलेचा यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानुन विद्यार्थ्यांसाठी आयोजित कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध नृत्य कौशल्य, गायन, शायरी यांचे सादरीकरण केले . विद्यार्थ्यांसाठी विविध खेळ आयोजित करण्यात आले. कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला, विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनातुन मि . फ्रेशर आणि मिस. फ्रेशर निवडण्यात आले. प्रथम वर्ष बी. फार्मासी मधुन कुमार मिथिलेश जाधव आणि कुमारी वैष्णवी शिंदे ,डी. फार्मासी मधुन कुमार केतन बडगुजर आणि कुमारी सायली इलग यांची मिस्टर फ्रेशर आणि मिस.फ्रेशर म्हुणुन निवड करण्यात आली. या कार्यक्रमास महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रभारी डॉ. मनीषा तायडे , डॉ. अमर झाल्टे ,कल्चरल इन्चार्ज , शुभम अहिरे, कुमारी रुचिता तिवारी आणि सौ. पल्लवी उगले यांचे मार्गदर्शन आणि नियोजन लाभले. कार्यक्रम महाविद्यालयातील तृतीय आणि द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी नियोजित करून उत्साहपूर्वक पार पडला.यावेळी कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष नरेंद्रभाई ठक्कर, उपाध्यक्ष प्रकाशभाई पटेल, फार्मसी महाविद्यालयाचे अध्यक्ष अनिलभाई बदियानी, विश्वस्त मोहनभाई पटेल, संयुक्त सचिव उपेंद्रभाई दीनानी आणि संस्थेचे इतर सदस्य , सर्व प्राध्यापकवृंद , शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज :मुख्य संपादक :डॉ भागवत महाले : मो. ८२०८१८०५१०
