बिटको महाविद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिनी ‘दोन दिवसीय ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन
β : नाशिकरोड :⇒ बिटको महाविद्यालयात ‘ वाचन प्रेरणा दिनी दोन दिवसीय ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन – (प्रतिनिधी : संजय परमसागर )
β⇒दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक: सोमवार : दि. 17 ऑक्टोबर 2023
β⇒नाशिकरोड, ता.16 (प्रतिनिधी : संजय परमसागर ) :- ” प्रचंड इच्छाशक्ती व प्रबळ आत्मविश्वास असलेले संपूर्ण भारतात युवकांसाठी आदर्श दीपस्तंभ ठरावा, अशी अतुलनीय व्यक्ती म्हणजे भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी. जे. अब्दुल कलाम होय . प्रत्येक व्यक्तीने विद्यार्थ्याने वाचनासाठी वेळ काढला पाहिजे . संपूर्ण जीवनात साथ देण्याचे आणि संकटाशी लढण्याचे सामर्थ्य वाचनानेच मिळत असते . वाचनासाठी आपल्या महाविद्यालयातील ग्रंथालयात भरपूर साहित्य जवळपास एक लाखाच्या वर ग्रंथसंपदा व पुस्तके उपलब्ध आहेत . त्याचा नक्की लाभ घ्या ,” असे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी केले . गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयातील बाळाराम लाहोटी ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.यानिमित्त ग्रंथालयात दि. १६ व १७ ऑक्टोबर या दोन दिवसीय ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला . ग्रंथपाल श्रीपाद चंद्रात्रे यांनी आपल्या प्रास्ताविक करताना,३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या धर्तीवर छत्रपती शिवाजी महाराज व स्वातंत्र्यलढ्याचे पुस्तके ठेवण्यात आली आहेत तसेच इतर वाचनाची ३०० हून अधिक पुस्तके वाचनासाठी ठेवण्यात आली आहेत . विद्यार्थी व प्राध्यापक , शिक्षकांनी प्रदर्शनास भेट देऊन ठेवलेल्या ग्रंथातून आपल्या आवडीचा ग्रंथ वाचावा व वाचन संस्कृती वाढवावी असे सांगितले . याप्रसंगी डॉ. सुधाकर बोरसे व नरेश पाटील यांनी स्वलिखित १५ पुस्तके ग्रंथालयास सप्रेम भेट दिली . कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ अनिलकुमार पाठारे , डॉ.आकाश ठाकूर , कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सुनिता नेमाडे पर्यवेक्षिका प्रणाली पाथरे यासह विभाग प्रमुख प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते . ग्रंथ प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी महेश टोचे , श्रीमती मेघा गोतराज , श्रीमती सुरेखा टोचे , श्रीमती चंद्रकला मते , श्रीमती शेंद्रे , दुर्गेश चौधरी , नारायण दराडे , पंकज थेटे , शितल घुगे , अनिल गोरे यांनी प्रयत्न केले .
β⇒दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो ८२०८१८०५१०
🅱️: येडशी(धाराशिव ):⇔ “९ लाख ७१ हजार भाविकांना एसटीने सुखरूप ‘विठ्ठल दर्शन’ घडवले” : परिवहन मंत्री- प्रताप सरनाईक-( प्रतिनिधी : सुभान शेख )
8 hours ago
🅱️: नाशिक(शहर):⇔बी.वाय.के. कॉलेजमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी-‘गुरु’ विषयी विद्यार्थ्यांचे मनोगत आणि सादरीकरणाने भारावले वातावरण-( प्रतिनिधी : प्रा. छाया लोखंडे )
9 hours ago
🅱️ : उरण(रायगड ):⇔कोंढरीपाडा–कासवलेपाडा मुख्य रस्त्यावर लाईटचे लोकार्पण – ३५ वर्षांचा अंधार संपला, प्रकाश दिव्याची सोय-(प्रतिनिधी : विठ्ठल ममताबादे)
9 hours ago
🅱️ : उरण,(रायगड ):⇔वेश्वि येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी नेत्र तपासणी शिबिर यशस्वीरित्या पार पडले-(प्रतिनिधी : विठ्ठल ममताबादे)
1 day ago
🅱️: उरण(रायगड ):⇔शहरी व ग्रामीण भागातील विजेच्या समस्यावर शिवसेना आक्रमक शिष्टमंडळाने घेतले अभियंत्याची भेट; वेळेत कामे पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा-( प्रतिनिधी : विठ्ठल ममताबादे)
🅱️ : उरण,(रायगड ):⇔ समाधान म्हात्रे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस रायगड जिल्हाध्यक्षपदी भव्य नियुक्ती : पक्षनिष्ठ कार्यकर्त्याला मिळाले नेतृत्वाचे सन्मानचिन्ह-(प्रतिनिधी : विठ्ठल ममताबादे)
4 days ago
🅱️ : नाशिक (शहर ):⇔ डॉ. एम. एस. गोसावी यांच्या द्वितीय स्मृतिव्याख्यानात ‘कलापूर्ण जगण्याचे शिक्षण’ “कला ही संस्कारातून येते”- पद्मश्री तालयोगी सुरेशजी तळवळकर-( प्रतिनिधी:छाया लोखंडे)
4 days ago
🅱️ : उरण(रायगड ):⇔डॉ. नानासाहेब धर्माधिकारी पुण्यस्मरण दिनानिमित्त केळवणेत वृक्षवाटप आणि ‘निसर्ग मित्र पुरस्कार’ वितरण सोहळा उत्साहात संपन्न-(प्रतिनिधी : विठ्ठल ममताबादे)
4 days ago
🅱️: उरण,(रायगड ):⇔कामगार आणि शेतकरी या देशाचा खरा मालक: महेंद्रशेठ घरत-(प्रतिनिधी : विठ्ठल ममताबादे )