β : पुणे :⇒ “नवीन शैक्षणिक धोरणात व्यावसायिक शिक्षणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणार”-श्री.मारुती आर.जगताप ( सहा.संचालक,तंत्रशि.संचा.उपविभाग पुणे )-( प्रतिनिधी : विपुल धसाडे )
β : पुणे :⇒ "नवीन शैक्षणिक धोरणात व्यावसायिक शिक्षणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणार"-श्री.मारुती आर.जगताप ( सहा.संचालक,तंत्रशि.संचा.उपविभाग पुणे )-( प्रतिनिधी : विपुल धसाडे )
“नवीन शैक्षणिक धोरणात व्यावसायिक शिक्षणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणार “- श्री. मारुती आर. जगताप ( सहाय्यक संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय उपविभाग पुणे)
β⇒“दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि 17 ऑक्टोबर 2023
β⇒पुणे, ता .16 ( प्रतिनिधी : विपुल धसाडे ) :-“विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक- शिक्षक यांच्यामध्ये नियमितपणे सुसंवाद हवा नवीन शैक्षणिक धोरणामध्ये समाविष्ट केलेल्या विविध कौशल्य मूल्यांचे, विशेषता व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासाचे ध्येय निश्चित सुलभ होणार आहे,”असे प्रतिपादन सहाय्यक संचालक,तंत्रशिक्षण संचालनालय उपविभाग पुणे -श्री.मारुती आर.जगताप यांनी मार्गदर्शन करताना केले. ते पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या खराडी येथील शंकरराव उरसळ फार्मासुटिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रथम वर्ष डी. फार्म, बी. फार्म. व एम. फार्म विद्यार्थी परिचय -पालक मेळाव्यात बोलत होते.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अजीव सदस्य व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदीप कदम अध्यक्षीय भाषणात बोलतांना म्हणाले की , ‘ स्वातंत्र्यपूर्व काळापासून आदरणीय बाबुरावजी घोलप यांच्या प्रयत्नातून पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची स्थापना शहरी – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आवश्यक शिक्षण सुविधा सुलभतेने मिळण्यासाठी करण्यात आली.महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री संस्थेचे अध्यक्ष अजित दादा पवार यांच्या महत्वकांक्षी ध्येयधोरणातून पुणे जिल्हा शिक्षण मंडळ मूलभूत सुविधा बरोबरच अत्याधुनिक शिक्षण सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सतत प्रयत्नशील आहेत.फार्मसी क्षेत्रामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयातील अत्याधुनिक सुविधा व तज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाने नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून यशस्वी होणे आवश्यक आहे. पालकांनी आपला पाल्य नियमित महाविद्यालयांमध्ये जातो, त्याची प्रगती योग्य त-हेने होत आहे, याकडे लक्ष देण्याची गरज आहे,असे त्यांनी सांगितले .
त्याअगोदर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन सदस्य व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक भोसले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना म्हणाले , की नवीन प्रवेशित विद्यार्थी व त्यांचे पालक यांना महाविद्यालयाची सर्वांगीण माहिती व्हावी,या उद्देशाने पालक मेळावाआयोजित केला असल्याचे सांगितले, ते बोलताना म्हणाले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या विविध मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरून आपले महाविद्यालय फार्मसी क्षेत्रामध्ये शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच सामाजिक उपक्रमांचे आयोजन विद्यार्थ्यांसाठी नियमितपणे कार्य करत असते. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन आपला सर्वांगीण विकास साधने आवश्यक असून यामुळेच उद्याचा आदर्श नागरिक घडेल, असा विश्वास प्राचार्यांनी व्यक्त केला.
यावेळी सर्व मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. त्यानंतर शैक्षणिक कामकाजात सोबतच विद्यार्थी मूल्यमापन , क्रिडा, विविध स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती, महाविद्यालयातील पाळावयाचे नियम, फार्मसी करीयरच्या नवनवीन संधी, महिला तक्रार निवारण समिती, अँटी रॅगिंग समिती , महाविद्यालयात विद्यार्थी सर्वांगीण विकासासाठी आयोजित करण्यात येणारे नवनवीन उपक्रमा याविषयी माहिती महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी सर्व उपस्थितांना दिली. या कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ओळख व जबाबदारी सांगण्यात आली.कार्यक्रमास उपस्थित पालक रमेश नेमाने, राजेंद्र वाबळे, रमजान शेख , महाविद्यालयाचे नवीन प्रवेशित विद्यार्थी प्रणय भोज, तनिष्का पवार, श्रेया जंगणे यांनी महाविद्यालयाबाबत आपले विचार व्यक्त केले.
याप्रसंगी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ विजया बर्गे, डी फार्मसी विभाग प्रमुख डॉ सुजित काकडे, सर्व विभाग प्रमुख , सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कृणाल कणसे यांनी केले, तर कार्यक्रमाचे संयोजक डॉ प्रशांत खाडे आणि प्रा पल्लवी खाडे यांनी आभार मानले.
β⇒ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो. ८२०८१८०५१०