
बोरगाव (सुरगाणा) प्रतिनिधी : लक्ष्मन बागुल (दिव्य भारत बीएसएम न्यूज) :–

रुग्णांची सेवा म्हणजेच देवाची सेवा” या भावनेतून सुरगाणा नगरपंचायतचे विद्यमान नगरसेवक भगवान आहेर यांनी नवरात्री निमित्त सुरगाणा ग्रामीण रुग्णालय येथे औषधदानाचा अनोखा उपक्रम राबवला. रुग्णांच्या खोकला, सर्दी, थंडी-ताप, पोटदुखी इत्यादी आजारावर उपचारासाठी लागणारी औषधे रुग्णालयाला प्रदान करण्यात आली.
या वेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी संजय चौधरी, डॉ. हर्षवर्धन मोरे, डॉ.राजपूत, डॉ.दीपक चौधरी, डॉ.अमोल महाले, डॉ.श्रीकांत कोल्हे , डॉ.दीपिका महाले, डॉ.योगिता जोपले,औषधं निर्माण अधिकारी विजय पवार, गौरव सोनवणे,जयेश मोरे, परिचारिका चौधरी,केंगा, सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.
रुग्णालय प्रशासनाने या दानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले की, “नगरसेवक भगवान आहेर यांचा हा उपक्रम गरजू रुग्णांना आजारातून मुक्त करणारा ठरेल.” नगरसेवक भगवान आहेर यांनी सांगितले की, “रुग्णसेवेमुळे मिळणारा आनंद हा अद्वितीय आहे. समाजातील प्रत्येकाने अशा कार्यात हातभार लावावा. या औषधदानामुळे केवळ रुग्णालयालाच नव्हे तर समाजालाही प्रेरणा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
दिव्य भारत बीएसएम न्यूज :