





श्रीमती मनीषा रामहरी कदम-खोबरे यांना महाराष्ट्र लोकविकास मंचतर्फेआदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर , कळंब येथे 10 डिसेंबरला वितरण

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार : दि.2 डिसेंबर 2023
β⇔येडशी (धाराशिव) , ता.2 ( प्रतिनिधी : सुभान शेख ) :- कळंब येथील महाराष्ट्र लोकविकास मंच स्वयंसेवी संस्थां संघटनेतर्फे 10 डिसेंबर 2023 रोजी श्रीमती मनीषा रामहरी कदम-खोबरे आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेतर्फे कळविण्यात आली आहे.
श्रीमती मनीषा रामहरी कदम-खोबरे उच्च विद्याविभूषित शिक्षण घेऊन सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सातेफळ , (ता. कळंब) विद्यालयात २००४ पासून सेवेत आहेत. त्या विनाअनुदानित शाळेत २००४ रुजू होवून शिक्षणाचे ज्ञानदान करत असून अनुदानाची कुठलीही शाश्वती नसताना,अहोरात्र मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी निरंतर कार्यरत आहात. धनाची कुठलीही अपेक्षा न करता अविरत सेवा चालू आहे.सदर बाब ही शैक्षणिक क्षेत्रातील अभिमानाची बाब आहे.आपलं जीवन शैक्षणिक कार्यासाठी समर्पित केले आहे. आपल्या शैक्षणिक कार्यातून शेकडो मुलं शिक्षण घेऊन बाहेर पडली आहेत. अनेक मुलं पोलीस, बँक ,मिलिटरी, विविध उत्पादन करणाऱ्या कंपन्या, विविध व्यवसाय, आदर्श शेतकरी अशी मुलं मुली स्वतःच्या पायावरती उभी करण्याचे योगदान आपल्या हातातून लाभले आहे, याचा आम्हाला आनंद वाटतो.
आपले विद्यालय विकसित करण्यामध्ये आपला खारीचा वाटा आहे. मुलांची कला, कौशल्य ,संस्कृती विभागामध्ये पारंगत व्हावीत, म्हणून आपल्या पुढाकारातून सांस्कृतिक आणि कलाक्षेत्रामध्ये मुलांना राज्य पातळी पर्यंत घेऊन गेलात. ती तपश्चर्या आपल्या कार्यातून समाजाप्रती आदर्शवत ठरत आहे. आपण एक उत्कृष्ट कवी, साहित्यिक आहात , आपल्या साहित्य आणि कवितेच्या माध्यमातून सामाजिक बदलाचे खूप मोठे योगदान दिलेले आहे. आपण राजमाता जिजाऊ, राजमाता अहिल्या होळकर, सावित्रीमाता फुले यांचा वारसा घेऊन जगत आहात. ज्ञानाची दिनचर्या अखंडपणे तेवत ठेवत आहात. म्हणून या ज्ञानदानाच्या कार्याचा गौरव व्हावा, सन्मान व्हावा, म्हणून महाराष्ट्र लोकविकास मंच मार्फत दिला जाणारा मानाचा पुरस्कार 10 डिसेंबर 2023 रोजी आपणास शाल, श्रीफळ, ट्रॉफी, मानपत्र देऊन संस्था कळंब (जि. धाराशिव) या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे, असे पत्र श्रीमती मनीषा रामहरी कदम-खोबरे यांना दिली आहे. अशी माहिती महाराष्ट्र लोकविकास मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वनाथ (अण्णा) तोडकर आणि सचिव भूमिपुत्र वाघ यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे दिव्य भारत बीएसएम न्यूजला कळविण्यात आली आहे.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो. ८२०८१८०५१०
