β : येडशी :⇔ येडशीत दररोज महावितरणकडून विद्युत खंडित, नागरिक त्रस्त, वरिष्ठ अधिकारी सुस्त, शेतकरी संतप्त -(प्रतिनिधी : सुभान शेख)
β : येडशी :⇔ येडशीत दररोज महावितरणकडून विद्युत खंडित, नागरिक त्रस्त, वरिष्ठ अधिकारी सुस्त, शेतकरी संतप्त -(प्रतिनिधी : सुभान शेख)
येडशीत दररोज महावितरणकडून विद्युत खंडित , नागरिक त्रस्त , वरिष्ठ अधिकारी सुस्त, शेतकरी संतप्त
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि, 15 जानेवारी 2024
β⇔येडशी(धाराशिव), दि.14( प्रतिनिधी : सुभान शेख ):- धाराशिव तालुक्यातील येडशी येथे मागील अनेक दिवसांपासून विद्युतमहामंडळ विभागाच्या महावितरणकडुन विद्युत खंडित होत आहे. असुरळीत विद्युत पुरवठा होत असल्याने सामान्य नागरिक त्रासून गेले आहेत. नेहमी खंडित विद्युत पुरवठा होत असल्याने अनेक नागरिक विद्युत विज कधी पहाटे, कधी दुपारी, कधी संध्याकाळी तर , रात्री – अपरात्री आणि जर एखादे इलेक्ट्रॉनिक वस्तू जळाली तर , करायचे काय ? अशा प्रकारे महावितरणकडुन नेहमी खंडित विद्युत होत असल्याने नागरिक त्रासून गेले आहेत.
येडशी प्रतिनिधीने माहिती विचारण्यासाठी महावितरण कार्यालयात फोन केले तर , प्रतिनिधीना चक्क सांगितले जाते की , धाराशिवहुन थ्री फेज 33 केव्हीचा घोटाळा झाला आहे. अशी माहिती दिली जात आहे. दररोज प्रतिनिधीना दिली जाते. जर एखाद्ये थ्री फेज 33 केव्हीचा घोटाळा झाले असेल तर , मग या थ्री फेज 33 केव्हीला दुरुस्त करण्यासाठी येडशी महावितरण सहाय्यक अभियंता यांनी पत्राद्वारे नवीन केबलची मागणी करुन दुरुस्त करावे लागते. परंतु यांच्याकडून कोणतेही काम वेळेवर होत नाही. फक्त उडवा – उडवीची उत्तरे दिली जात आहे. यांच्या कडून उलट विना कारण विद्युत विज खंडित करून , विजेचा लपंडाव करीत आहे.
तसेच , येडशी नागरिक महावितरणच्या कार्यालयात फोन केले असता तर , ऑपरेटर कधी फोन उचलत नाही तर , कधी सहाय्यक उप अभियंता येडशी प्रतिनिधीचे फोन उचलत नाही. माहिती विचारण्यासाठी महावितरणचे अधिकारी यांना फोन केले असता तर , अधिकारीकडून उडवा – उडवीची उत्तरे दिली जात आहे. अशा घटनेला जबाबदार कोण राहणार ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तरी महावितरणचे वरीष्ठ अधिकार्यांनी लवकरात लवकर दखल घेऊन , धाराशिवहुन येणारा थ्री फेज 33 केव्हीचा प्रश्न मार्गे लावून , या येडशी विद्युत विज महावितरण सहाय्यक अभियंता यांना सुचना देऊन सुरळीत विद्युत विज चालु ठेवावे. अशी मागणी ग्रामस्थांनातुन होत आहे.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले: मो ८२०८१८०८१०