हतगड ग्रामपंचायत उपसरपंचपदी नवनाथ पवार यांची बिनविरोध निवड
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : गुरुवार : दि. 18 जानेवारी 2024
β⇔सुरगाणा,ता.18 ( प्रतिनिधी : एकनाथ शिंदे ) :- सुरगाणा तालुक्यातील हतगड ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंचपदासाठी सरपंच देविदास दळवी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते जाणू बागुल यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक घेण्यात आली.उपसरपंचपदासाठी नवनाथ पवार यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.
यावेळी हतगड गावचे पोलीस पाटील राजुभाऊ जाधव , गणेश भाऊ जाधव ग्रामपंचायत सदस्य, सुनील पवार,भानुदास दळवी,जाणू बागुल,एकनाथ गवळी,सदस्या तुळसा गाढवे,मंगळीबाई लिलके,यशोधा दळवी,छबिबाई भोये,राधाबाई खांबाईत,संगीता गवळी,गिरजाबाई पवार आदी सदस्य उपस्थितीत होते.तसेच ग्रामस्थ ,प्रभू पवार,राजू पीठे,जीवन मोहन,झिप्रु पवार,लखन पवार,सखाराम धुळे,शांताराम गांगुर्डे, नारायण पवार,संपत गांगुर्डे,अशोक गांगुर्डे, रतन घाटे,सोमा पवार,बाबू पवार,रमेश गांगुर्डे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते
ग्रामविकास अधिकारी म्हणून व्ही.भोये यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम केले.नवनाथ पवार यांची बिनविरोध निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी भंडारा गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला व नवनाथ पवार यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले: मो. ८२०८१८०८१०