β : सुरगाणा (ग्रामीण) :⇔ पळसन ग्रामपंचायत सरपंचाचा मनमानी कारभार ? ग्रामसभेत जिल्हा परिषद माजी सदस्य सुभाष चौधरी यांचा आरोप – (प्रतिनिधी : पांडुरंग बिरार)
β : सुरगाणा (ग्रामीण) :⇔ पळसन ग्रामपंचायत सरपंचाचा मनमानी कारभार ? ग्रामसभेत जिल्हा परिषद माजी सदस्य सुभाष चौधरी यांचा आरोप - (प्रतिनिधी : पांडुरंग बिरार)
पळसन ग्रामपंचायत सरपंचाचा मनमानी कारभार ?ग्रामसभेत जिल्हा परिषद माजी सदस्य सुभाष चौधरीयांचा आरोप
β : सुरगाणा (ग्रामीण) :⇔ पळसन ग्रामपंचायत सरपंचाचा मनमानी कारभार ? ग्रामसभेत जिल्हा परिषद माजी सदस्य सुभाष चौधरी यांचा आरोप – (प्रतिनिधी : पांडुरंग बिरार)
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : रविवार : दि.28 जानेवारी, 2024
β⇔सुरगाणा (ग्रामीण), दि.28 (प्रतिनिधी : पांडुरंग बिरार) :- प्रजासताक दिनानिमित तालुक्यातील पळसन येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ग्रामसभेला दोनशेपेक्षा अधिक ग्रामस्थाची उपस्थिति लावली होती . यावेळी सरपंचावर ग्रामपंचाती अंतर्गत सुरू असलेल्या विविध विकास कामांबाबत आरोप करण्यात आले. यावेळी आमदा (प) गावातील ग्रामस्थानी सरपंच यांच्या घराजवळील नळाच पाणी येते. मात्र गावात ईतरत्र कुठेही पाणी येत नाही, रस्ता देखील सरपंचाच्याच घराजवळ करण्यात आला आहे, असा आरोप ग्रामसभेत करण्यात आला.
जिल्हा परिषद माजी सदस्य सुभाष चौधरी यांनी ग्रामपंचायतीतर्फे सुरु असलेल्या विकासकामाचा दर्जा निकॄष्ट असुन या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला, असल्याचा आरोप ग्रामसभेत केला . सरपंच व ठेकेदारांचे साटेलोटे असल्याचा आरोप ग्रामसभेत करण्यात आला. वाघाडी, जाभिंपाडा, चिंचपाडा, मेरदांड गावांना ग्रामपंचायतीने केलेली कामे निकॄष्ट दर्जाची असल्याचा आरोप चौधरी यांनी केला आहे. ग्रामपंचायतीने दिलेली कामे निकॄष्ट दर्जाची असल्याने ठेकेदाराला काळया यादीत टाकावे. यानंतर त्याला कोणतीही कामे देण्यात येऊ नये, असा ठराव ग्रामपंचायतीतर्फे केला. यावेळी सदस्य कैलास पवार यांनी सांगतले, की पळसन ग्रामपंचायत ही विकास कामे करण्यासाठी सक्षम नाही. विकास कामे करण्यासाठी ठेकेदार दिला जातो असा आरोप ग्रामसभेत केला. वादळी ठरलेल्या ग्रामसभेस गावातील उपसरपंच लक्ष्मी चौधरी, सदस्य एकनाथ गवळी, हेमराज मिसाळ, सुरेश गावित, कैलास पवार, भरत पवार, मनोहर जाधव, माजी सरपंच केशव गवळी, राजु गवळी, कॄषि सहायक भोये, पशुवैधकिय कर्मचारी, शासकीय आश्रम शाळेचे मुख्याधापक आर. जे.येवले आदिसह ग्रामस्थ मोठया संख्येत उपस्थित होते.
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले:मो. ८२०८१८०५१०
🅱️ :नागपूर:⇔ गुढीपाडवा: संपूर्ण सृष्टीसाठी शुभ,समृद्ध, नवचैतन्य व मांगल्याचे प्रतीक-(प्रतिनिधी-रमेश लांजेवार)
4 days ago
🅱️ : सुरगाणा (नाशिक):⇔कोल्हापूर रंगभूमीवर विधिनाट्य महोत्सवात आदिवासी कला संस्कृतीचे दर्शन ! कलाप्रेमी रसिकांना आदीम संस्कृतीची भुरळ; हजारो प्रेक्षकांनी घेतला आनंद !-(प्रतिनिधी-रतन चौधरी)
7 days ago
🅱️: वणी (नाशिक):⇔वणी येथे पुणेगाव धरण्याचा डाव्या कालव्यात पडून शाळकरी आठ वर्षीय बालकांचा आकस्मिक मृत्यू-(प्रतिनिधी-सुरेश सुराशे )
7 days ago
🅱️: निफाड( नाशिक):⇔सेवानिवृत्त शिक्षकांची अंशराशीकरणाची १२ लाखापेक्षा अधिक रक्कमेचा अपहार;साखळी उपोषण तदनंतर आमरण उपोषण-(प्रतिनिधी-रावसाहेब जाधव)