दिव्य भारत बी एस एम न्यूज : बुधवार : दिनांक : २९ एप्रिल २०२६
के.टी.एच.एम. महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. कल्पना आहिरे यांची नियुक्ती

नाशिक : (प्रतिनिधी : डॉ. भागवत महाले ):– शिक्षण क्षेत्रात आपल्या कार्यकुशलतेचा ठसा उमटवणाऱ्या आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या प्राचार्य डॉ. कल्पना आहिरे यांची मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे के. टी. एच. एम. महाविद्यालय, नाशिक येथे प्राचार्यपदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे केवळ महाविद्यालयाचा नव्हे तर संपूर्ण शैक्षणिक क्षेत्राचा गौरव वाढला आहे.
प्राचार्य डॉ. कल्पना आहिरे यांनी राज्यशास्त्र विषयाच्या अध्यापनात दीर्घकाळ योगदान देत असताना विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित ज्ञान न देता त्यांना सामाजिक, राजकीय आणि संविधानिक जाणीवांनी समृद्ध करण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या अध्यापन पद्धतीत विषयाची सखोलता, स्पष्टता आणि समकालीन संदर्भांची सांगड यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विचारशीलता आणि जबाबदार नागरिकत्वाची जाणीव निर्माण झाली आहे.

राज्यशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्य करताना त्यांनी विभागाचा दर्जा उंचावण्यासाठी अनेक उपक्रम राबवले. विविध कार्यशाळा, परिसंवाद, चर्चासत्रे आणि शैक्षणिक प्रकल्प यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक ज्ञान देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा, संशोधन आणि विविध शैक्षणिक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे.त्यांचा शैक्षणिक प्रवास केवळ अध्यापनापुरता मर्यादित नसून त्यांनी प्रशासकीय क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. माजी सिनेट सदस्या म्हणून त्यांनी विद्यापीठाच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतला. शैक्षणिक गुणवत्ता, पारदर्शकता आणि संस्थात्मक विकास यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.

त्यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयात नवे शैक्षणिक उपक्रम, संशोधनाला चालना, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासावर अधिक भर दिला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी नियुक्त झाल्यानंतर डॉ. आहिरे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “ही जबाबदारी माझ्यासाठी सन्मानासोबतच एक मोठे कर्तव्य आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि संस्थेचा सर्वांगीण प्रगतीचा मार्ग अधिक भक्कम करण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन.” त्यांच्या या विधानातून त्यांची कार्यनिष्ठा आणि दूरदृष्टी स्पष्ट होते.महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारीवर्ग, माजी विद्यार्थी तसेच शिक्षणप्रेमींनी त्यांच्या नियुक्तीचे मनापासून स्वागत आणि अभिनंदन केले आहे. अनेकांनी सामाजिक माध्यमांवर तसेच प्रत्यक्ष भेटीतून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालय नवीन उंची गाठेल, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला आहे.

प्राचार्य म्हणून त्यांची भूमिका अधिक व्यापक असून संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी नवे दृष्टीकोन आणि धोरणे अमलात आणण्याची गरज आहे. शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे, संशोधनाला चालना देणे, विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासासाठी नवनवीन संधी उपलब्ध करून देणे आणि समाजाभिमुख उपक्रम राबवणे यावर त्यांचा विशेष भर असेल, अशी अपेक्षा आहे. महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी त्यांनी सर्व घटकांना एकत्र आणून टीमवर्कच्या माध्यमातून काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचारी यांच्यात सुसंवाद आणि समन्वय वाढेल, ज्यामुळे संस्थेची प्रगती अधिक वेगाने होईल. त्यांच्या पुढील कामकाजाच्या शुभेच्छा देण्यासाठी शिक्षणाधिकारी डॉ.नितीन जाधव , शिक्षणाधिकारी डॉ.भास्कर ढोके , प्रा. डॉ. भागवत महाले, सौ.वैशाली महाले , डॉ.अभिन पोटे, डॉ.शिवाजी गांगुर्डे यांनी त्यांच्या या यशस्वी वाटचालीसाठी त्यांना सत्कार करून हार्दिक अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! यावेळी प्रो. डॉ. भागवत महाले, सौ.वैशाली महाले यांनी सपत्नीक प्रो. डॉ. भागवत महाले लिखित “महाराष्ट्रातील आदिवासी समाजजीवन “हे पुस्तक शिक्षणाधिकारी डॉ.नितीन जाधव, शिक्षणाधिकारी डॉ.भास्कर ढोके, प्राचार्य डॉ. कल्पना आहिरे सप्रेम भेट दिले.
पुस्तक : १)“महाराष्ट्रातील आदिवासी समाजजीवन ” रुपये :४००/- सवलत किमंत:-३२०/-
२)महाराष्ट्रातील जात आणि जमात पंचायती -रुपये :३००/- सवलत किमंत :-२४०/-
( फक्त १५ दिवसासाठी : संपर्क : 8208180510

दिव्य भारत बी एस एम न्यूज : बुधवार : दिनांक : २९ एप्रिल २०२६
