दिव्य भारत बीएसएम न्यूज : बुधवार ,दिनांक : 8 जुलै 2026

प्रेम, आपुलकी आणि शुभेच्छांचा वर्षाव; वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे पत्रकार सुभान शेख यांचे मनःपूर्वक आभार
दिव्य भारत बीएसएम न्यूज
येडशी | (प्रतिनिधी सुभान शेख):-
दिनांक ७ जुलै (मंगळवार) रोजी दिव्य भारत बीएसएम न्यूज या यूट्यूब चॅनल व दैनिक वर्तमानपत्राचे पत्रकार तथा व्हॉइस ऑफ मीडिया धाराशिव जिल्ह्याचे तालुका अध्यक्ष सुभान शेख यांचा वाढदिवस उत्साहात साजरा झाला. वाढदिवसानिमित्त राज्याच्या विविध भागांतून पत्रकार, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट, दूरध्वनी, सामाजिक माध्यमे आणि शुभेच्छा संदेशांद्वारे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.वाढदिवसानिमित्त दिव्य भारत बीएसएम न्यूजचे संपादक डॉ. भागवत महाले यांनी सुभान शेख यांना मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांच्या पत्रकारितेतील कार्याचा गौरव केला. समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडणारे, लोकहिताच्या विषयांवर सातत्याने वृत्तांकन करणारे पत्रकार म्हणून त्यांनी सुभान शेख यांच्या कार्याचे कौतुक केले आणि त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी व्हॉइस ऑफ मीडिया धाराशिव जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष बनसोडे साहेब यांनी विशेष शुभेच्छा संदेश पाठवून उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. पत्रकार मनोज जाधव यांनीही आकर्षक शुभेच्छापत्र तयार करून वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या.येडशी गावातील माजी उपसरपंच, लाडके नेते गजानन भैय्या नलावडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह प्रत्यक्ष भेट घेऊन सुभान शेख यांचा सत्कार केला. तसेच त्यांच्या कार्यसंघातील सर्व कार्यकर्त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत पुढील सामाजिक आणि पत्रकारितेच्या वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. धाराशिव जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांनीही प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. राज्याच्या कानाकोपऱ्यातील अनेक पत्रकार मित्रांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. विविध जिल्ह्यांतील पत्रकार बांधवांनी सामाजिक माध्यमांवर शुभेच्छा संदेश पाठवत त्यांच्या कार्याबद्दल आदर व्यक्त केला.येडशी गावातील पत्रकार बांधव, ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे सदस्य, शिक्षक, मित्रपरिवार आणि नागरिक यांनीही वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला.ग्रामपंचायतीच्या उपसरपंच स्वाती शेळके यांचे पती सुनील भैय्या शेळके यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा देत उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पत्रकारितेतील अधिक यशासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. गावातील अनेक ज्येष्ठ नागरिक, तरुण, सामाजिक कार्यकर्ते आणि मित्रपरिवार यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.
वाढदिवसानिमित्त मिळालेल्या या प्रेम, स्नेह आणि आपुलकीबद्दल पत्रकार सुभान शेख यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “आपण सर्वांनी दाखविलेल्या प्रेमामुळे माझा वाढदिवस अविस्मरणीय ठरला. पत्रकारितेच्या प्रवासात आपण सर्वांनी दिलेला विश्वास आणि सहकार्य हीच माझी खरी ताकद आहे. भविष्यातही समाजहितासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा माझा प्रयत्न कायम राहील.”ते पुढे म्हणाले, “माझ्या वाढदिवसानिमित्त प्रत्यक्ष भेटून, दूरध्वनीद्वारे, सामाजिक माध्यमांवर तसेच विविध शुभेच्छा संदेशांद्वारे शुभेच्छा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा मी मनापासून ऋणी आहे. नकळत कोणाचे नाव उल्लेखायचे राहून गेले असल्यास त्या सर्वांचीदेखील मी मनःपूर्वक क्षमा मागतो आणि त्यांचेही तितकेच आभार मानतो.”शेवटी त्यांनी सर्वांना धन्यवाद देत असेच प्रेम, सहकार्य आणि आशीर्वाद कायम राहू दे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
आपले प्रेम, विश्वास आणि शुभेच्छा हेच माझ्यासाठी सर्वात मोठे बळ आहे.
– सुभान शेख
पत्रकार, दिव्य भारत बीएसएम न्यूज (यूट्यूब चॅनल व दैनिक वर्तमानपत्र)
तालुका अध्यक्ष, व्हॉइस ऑफ मीडिया, धाराशिव
आपल्या सर्वांचे मनःपूर्वक शतशः आभार!
दिव्य भारत बीएसएम न्यूज
प्रतिनिधी : सुभान शेख

दिव्य भारत बीएसएम न्यूज : बुधवार ,दिनांक : 8 जुलै 2026
