दिव्य भारत बी एस एम न्यूज : दिनांक :14 डिसेंबर 2025
रावळगाव , प्रतिनिधी प्रा. अंबादास पाचंगे):-

रावळगाव महाविद्यालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरीनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन
“माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे” – प्राचार्य डॉ. पी. वाय. व्याळीज
रावळगाव: श्री स्वामी समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावळगाव, ता. मालेगाव जि. नाशिक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुरेश दादाजी वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. वाय. व्याळीज हे उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. वाय. व्याळीज यांच्यासह उपस्थितांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे प्रतिमा पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. अंबादास पाचंगे यांनी केले, त्यात त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.
यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. वाय. व्याळीज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा गौरव उदगार करताना म्हणाले की, भारतातील विसाव्या शतकातील स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहासाचे आकलन व विवेचन करताना डॉ. आंबेडकरांच्या कार्याचा संदर्भ घेतल्याखेरीज पूर्ण होणार नाही. भारतातील पारंपारिक समज व्यवस्थेतील स्त्रिया, शुद्र-अतिशूद्र यांना सर्वच मानवी हक्क नाकारले होते. डॉ. आंबेडकरांनी अतिशय संघर्षाने ही व्यवस्था मोडीत काडून, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारी व स्वातंत्र्य, समता व बंधुता असणारी एक नवीन समाजव्यवस्था निर्माण करण्याचे महान कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. त्यामुळेच आज प्रत्येकाला अनेक अधिकार मिळालेले आहेत, याचे सर्व श्रेय हे डॉ. आंबेडकरांना जाते. असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कामेश गायकवाड यांनी केले, या कार्यक्रमास उपस्थितांचे आभार प्रा. धनंजय रौंदळ यांनी मानले.
या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयातील प्रा. अंबादास पाचंगे, प्रा. कामेश गायकवाड, प्रा. राज ठाकरे, प्रा. वैभव गायकवाड, प्रा. धनंजय रौंदळ, प्रा. अभिजित महाले, प्रा. सुयोग वाघ, प्रा. गीतांजली खैरनार, प्रा. सोनम पाटील, प्रा. चेतना अहिरे, प्रा. कावेरी जाधव, प्रा. दिव्यानी निकम, प्रा. हर्षदा पवार, प्रा. शीतल शेवाळे, यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस अभिवादन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. वाय. व्याळीज यांच्यासह प्राध्यापक- प्राध्यापिका व विद्यार्थी महापरीनिर्वाण दिनी अभिवादनपर कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. वाय. व्याळीज यांच्यासह डावीकडून प्रा. अंबादास पाचंगे, प्रा. गीतांजली खैरनार.

दिव्य भारत बी एस एम न्यूज : दिनांक :14 डिसेंबर 2025
रावळगाव , प्रतिनिधी प्रा. अंबादास पाचंगे):-
