मुदखेड येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा स्थापना दिवस साजरा
दिव्य भारत बी एस एम न्यूज : दिनांक : 29 डिसेंबर 2025

मुदखेड, प्रतिनिधी : साहेबराव गागलवाड ):-
मुदखेड येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा स्थापना दिवस स्व. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून साजरा करण्यात आला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष मुदखेडच्या वतीने गंगाधर डांगे यांच्या निवासस्थानी एक बैठक घेण्यात आली या वेळी देशाच्या दिवंगत माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे सर्वप्रथम पूजन करून अभिवादन करण्यात आले .
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यापासून ते आजच्या भारतात लोकशाही अधिक सशक्त, आणि बळकट ठेवण्यापर्यंत राष्ट्रनिर्मितीत ऐतिहासिक भूमिका बजावणारा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष लोकशाही मूल्यांचा, संविधानाचा आणि जनतेच्या अधिकारांचा रक्षक आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महात्मा गांधीजी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने लढा दिला आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले त्याचप्रमाणे विषमतेच्या विषवल्लीतून देश मुक्त करण्यासाठी आणि संविधानाच्या रक्षणासाठी आजही आदरणीय सोनिया गांधी, आदरणीय मल्लिकार्जुन खरगे, राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते लढा देत आहेत. संविधानिक मूल्यांचे रक्षण, लोकशाहीची मजबुती, शेतकऱ्यांच्या हक्कांची लढाई, युवकांचे सशक्तीकरण आणि वंचित, शोषित घटकांच्या न्यायासाठी काँग्रेस पक्ष नेहमीच ठामपणे उभा राहिला आहे आणि पुढेही पूर्ण निष्ठेने कार्यरत राहील. सामाजिक न्याय, समता, बंधुता आणि मजबूत भारताच्या उभारणीसाठी आमचा प्रयत्न दृढ असेल असे या वेळी सांगण्यात आले .
तसेच या दिनानिमित्त पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या
या कार्यक्रम प्रसंगी मुदखेड शहरात नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाच्या चार नगरसेवक निवडून आल्यामुळे त्यांचा आज पक्षाच्या स्थापना दिवशी गंगाधर डांगे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला यावेळी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा नवनिर्वाचीत नगरसेविका पठाण नाझीया बंदेअलीखान यांचे प्रतिनिधी मुजीब पठाण नवनिर्वाचित नगरसेवक अविनाश चौदंते, शेख उब्दुल खदीर भाई , गोदावरी बोकेफोड यांचे प्रतिनिधी संजय बोकेफोड, युवक काँग्रेसचे गिरिष कोत्तावार, शेख सोहेल, नागेश जंपलवाड आदिंची उपस्थिती होती.

