येडशी, ता. धाराशिव | दि. 10 जानेवारी 2026 | प्रतिनिधी : सुभान शेख

  • ह.भ.प. श्री परमेश्वर महाराज बोधले (कळंब–डिकसळ)
  • कीर्तनकार सौजन्य : श्री दत्तात्रय भागवत देशमुख
  • अन्नदाते : श्री अशोक भागवत देशमुख
  • शिवचरित्रकार ह.भ.प. श्री प्रविण महाराज दुशींग पाटील (पुणे)
  • कीर्तनकार सौजन्य : श्री सुदाम वसंत देशमुख
  • अन्नदाते : श्री दीपक गणेश देशमुख
  • ह.भ.प. श्री संत बाळुमामा चरित्रकार श्रीराम महाराज गुलदगड (बारामती)
  • कीर्तनकार सौजन्य : श्री अर्जुन रामलिंग देशमुख व श्री अशोक अरुण देशमुख
  • कै. अरुण केशव देशमुख यांच्या स्मरणार्थ
  • अन्नदाते : श्री पांडुरंग कुंडलिक देशमुख
  • सुरमणी ह.भ.प. श्री ज्ञानेश्वर महाराज तांबे (नेवासा)
  • कीर्तनकार सौजन्य : श्री विठ्ठल भारत कदम
  • कै. शंकरराव नलावडे यांच्या स्मरणार्थ
  • अन्नदाते : श्री बाजीराव नलावडे
  • ह.भ.प. श्री किर्तनकेसरी अक्रूर महाराज साखरे (गेवराई)
  • कीर्तनकार सौजन्य : श्री राजेंद्र माधव देशमुख
  • कै. विष्णुपंत देशमुख यांच्या स्मरणार्थ
  • अन्नदाते : श्री संजय विष्णुपंत देशमुख
  • ह.भ.प. श्री कविराज महाराज झावरे (पारनेर)
  • कीर्तनकार सौजन्य : श्री मोईन अनंता देशमुख
  • अन्नदाते : श्री मयुर राजेंद्र गुरव
  • ह.भ.प. श्री विशाल महाराज खोले (मुक्ताईनगर)
  • ज्ञानदाते : विघ्नहर्ता गणेश जयंती सप्ताह परिवार
  • अन्नदाते : श्री चांगदेव सखाराम सस्ते
  • ह.भ.प. श्री प्रकाश महाराज बोधले (कळंब–डिकसळ)
  • सकाळी 10 ते 12 : काल्याचे कीर्तन
  • कीर्तनकार सौजन्य : चेअरमन श्री निलेश तुकाराम देशमुख
  • महाप्रसाद अन्नदाते : श्री धर्मराज पंडित देशमुख
  • टीव्ही स्टार भाऊज्ञकर व श्री गणेश महाराज घाटोळे
  • जुगलबंदी संगीत कार्यक्रम

या अखंड हरिनाम सप्ताहात भक्ती, श्रद्धा व संस्कृती यांचा सुरेख संगम अनुभवायला मिळणार आहे. नामस्मरण व कीर्तनातून भक्तीचा जागर, तर शिवचरित्र व संतचरित्र कथांमधून समाजप्रबोधनाचा संदेश दिला जाणार आहे. महाप्रसादाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा जपला जाणार असून, सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे.

येडशी गावासह परिसरातील सर्व भाविकांनी कुटुंबासह या भव्य अखंड हरिनाम सप्ताहात सहभागी होऊन नामस्मरणाचा लाभ घ्यावा, तसेच धार्मिक–सांस्कृतिक परंपरेचा साक्षीदार व्हावे, असे आवाहन आयोजक मंडळ, विघ्नहर्ता गणेश जयंती सप्ताह परिवार व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

“नामस्मरणातून जीवन पावन करा” या भावनेतून येडशी येथे आयोजित हा अखंड हरिनाम सप्ताह निश्चितच भाविकांसाठी आध्यात्मिक पर्वणी ठरणार आहे