नाशिक जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक व पदवीधर शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून निवड श्रेणी टप्पा क्रमांक २ अखेर मंजूर करण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रक्रियेला मंजुरी मिळाल्याने शिक्षक वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही मंजुरी मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक विभाग) यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. राज्य कार्यवाह व सरचिटणीस मा. संजय बबनराव पगार यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक परिषदेने प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदने देत, चर्चा करत आणि सहकार्याची भूमिका घेत हा प्रश्न मार्गी लावला.

नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत एकूण

  • १४३९ प्राथमिक शिक्षक
  • २५ पदवीधर शिक्षक

अशा एकूण १४६४ शिक्षकांची निवड श्रेणी टप्पा क्रमांक २ मंजूर करण्यात आली आहे.
या निर्णयामुळे २४ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांना आर्थिक लाभ मिळणार असून त्यांच्या वेतनश्रेणीमध्ये सुधारणा होणार आहे.

  • मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ओमकार पवार
  • उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. महेश पाटील
  • शिक्षणाधिकारी श्रीमती सरोज जगताप
  • उपशिक्षणाधिकारी श्री. भास्कर कनोज
  • सहाय्यक प्रशासन अधिकारी श्री. महेंद्र पवार
  • चंद्रशेखर वैष्णव, सलीम पटेल, रोहित शिंदे
  • नितीन पवार व अनिल दराडे

यांचे विशेष योगदान असल्याचे शिक्षक परिषदेने नमूद केले.

या यशासाठी शिक्षक परिषदेचे अनेक पदाधिकारी सक्रिय होते –

राज्य कार्यवाह संजय पगार म्हणाले –

“निवड श्रेणी टप्पा १ नंतर गेल्या दोन वर्षांपासून टप्पा २ ची फाईल प्रलंबित होती. आम्ही सातत्याने पाठपुरावा केला. आंदोलनापूर्वीच प्रशासनाने २४ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या १४६४ शिक्षकांची निवड श्रेणी मंजूर केली, याबद्दल प्रशासनाचे आभार. तसेच १२ वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांचे वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्तावही लवकर मंजूर होतील अशी अपेक्षा आहे.”

या निर्णयामुळे जिल्ह्यातील शिक्षकांना आर्थिक स्थैर्य व मान्यता मिळणार असून, शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी संघटनात्मक प्रयत्न किती आवश्यक आहेत हे पुन्हा सिद्ध झाले आहे.नाशिक जिल्हा परिषदेत निवड श्रेणी टप्पा क्रमांक २ मंजुरी ही शिक्षकांसाठी मोठी उपलब्धी मानली जात आहे.