महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषदच्या अध्यक्षपदी डॉ. विलास आवारी यांची बिनविरोध, निवड – ४२ वे अधिवेशन चंद्रपूर येथे यशस्वी संपन्न

डॉ. विलास आवारी : प्रेरणादायी शैक्षणिक प्रवास:

डॉ. विलास आवारी यांचे योगदान केवळ अध्यापनापुरते मर्यादित नसून त्यांनी संशोधन व लेखन क्षेत्रातही मोठा ठसा उमटवला आहे.

  • २७ हून अधिक पुस्तके प्रकाशित
  • ५० पेक्षा अधिक संशोधन पेपर प्रसिद्ध
  • अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय परिषदांमध्ये सहभाग

त्यांचे विद्यार्थी आज महाराष्ट्रभर प्रशासकीय, शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात उच्च पदांवर कार्यरत आहेत.

पारनेर तालुक्याचा गौरव:

डॉ. विलास आवारी हे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील डॉ. रांधे गावचे रहिवासी असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातून परिषद अध्यक्षपदी निवड होणारे ते एकमेव प्राध्यापक ठरले आहेत. ही बाब त्यांच्या कार्याचा गौरव करणारी आहे.

या अधिवेशनात पुढील महत्त्वाच्या निवडी देखील करण्यात आल्या –

परिषदेच्या प्रशासनिक व शैक्षणिक कार्याचा समन्वय साधण्यासाठी डॉ. संभाजी पाटील यांची सचिवपदी निवड करण्यात आली.

मुंबई विद्यापीठात होणाऱ्या ४३ व्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. शाम शिरसाठ यांची निवड करण्यात आली.

परिषदेमध्ये पुढील मान्यवरांची निमंत्रित उपाध्यक्ष म्हणून निवड झाली –

  • प्राचार्य डॉ. मनोहर पाटील
  • प्रा. डॉ. प्यारेलाल
  • ज्ञानोबा ढगे
  • प्रा. डॉ. संजय गायकवाड
  • प्रा. डॉ. विठ्ठल महिंद्र पाटील
  • प्रा. डॉ. विनायक भटकर
  • प्रा. श्रद्धा कोठवडे

नवीन पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल महाराष्ट्र (२०२६–२०२९) या कालावधीसाठी निश्चित करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषदेमार्फत राज्यशास्त्र विषय अधिक विकसित करण्यासाठी तसेच भारतीय लोकशाहीला पूरक संशोधन व शैक्षणिक प्रबोधन करण्यासाठी कार्य केले जाते.परिषद आजपर्यंत ४२ अधिवेशने यशस्वीरीत्या आयोजित करून राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात आपले स्थान दृढ करत आहे. डॉ. विलास आवारी यांची अध्यक्षपदी झालेली निवड ही राज्यशास्त्र क्षेत्रासाठी प्रेरणादायी असून महाराष्ट्रातील शिक्षण व संशोधन परंपरेला नवी दिशा देणारी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.त्यांच्या नेतृत्वाखाली परिषद अधिक सक्रिय, व्यापक आणि प्रभावी होईल, अशी अपेक्षा राज्यभरातील अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.