सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न गोखले एज्युकेशन सोसायटी संचलित आर.एन.सी. आर्टस्, जे.डी.बी. कॉमर्स आणि एन.एस.सी. सायन्स कॉलेज (सी.बी.सी. महाविद्यालय), नाशिकरोड यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे २०२५–२६ या शैक्षणिक वर्षातील विशेष निवासी शिबिर कोटमगाव (ता. व जि. नाशिक) येथे उत्साहात पार पडले.

हे शिबिर “शाश्वत विकासासाठी युवक : पाणलोट आणि पडीक जमीन व्यवस्थापन” या संकल्पनेवर आधारित होते.

शिबिराचे प्रभावी संयोजन:

शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांनी गावाच्या विकासासाठी अनेक उपक्रम राबवले. त्यामध्ये –

  • बंधारे बांधकाम
  • गाव सर्वेक्षण
  • परिसर स्वच्छता अभियान
  • कचरा व्यवस्थापन
  • वृक्षारोपण
  • जलसंधारण व पाणी बचत जनजागृती
    • असे पर्यावरणपूरक उपक्रम विशेष उल्लेखनीय ठरले.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून स्वयंसेवकांनी समाजजागृतीसाठीही विविध कार्यक्रम घेतले.

  • आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर
  • किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य जनजागृती
  • व्यसनमुक्ती अभियान
  • स्त्री-पुरुष समानता
  • लोकसंख्या नियंत्रण जनजागृती
  • मतदान जनजागृती
  • पर्यावरण संवर्धन

यासारखे उपक्रम ग्रामस्थांमध्ये सकारात्मक संदेश देणारे ठरले.

विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी ग्रामस्थांची मने जिंकली. यामुळे गावकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

शिबिरात युवक सक्षमीकरण, अंधश्रद्धा निर्मूलन, महिला सबलीकरण, शाश्वत विकास, जलसंवर्धन यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले.तसेच –रस्ते सुरक्षा जनजागृती,स्वच्छता रॅली,“हेल्मेट फॉर लाईफ” मोहिम, यातून ग्रामस्थांना सुरक्षिततेचा संदेश देण्यात आला.

शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार पठारे, विविध विभागप्रमुख, कोटमगाव सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आणि स्वयंसेवक यांच्या उपस्थितीत पार पडले.

You’ve reached the maximum length for th