त्रकार हे लोकशाहीचे चौथे स्तंभ मानले जातात. त्यांच्या सुरक्षेचे आणि सन्मानाचे रक्षण करणे ही समाजाची जबाबदारी आहे. संतोष निकम यांनी पत्रकार संरक्षणाच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवला आहे. पत्रकारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात त्यांनी ठाम भूमिका घेतली असून त्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला आहे.त्यांच्या कार्यामुळे संघटनेला व्यापक ओळख मिळाली आहे. संघटनेची कार्यपद्धती अधिक संघटित आणि परिणामकारक बनली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये शाखा स्थापन करून पत्रकारांना एक मजबूत व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

संतोष निकम यांच्या वाढदिवसानिमित्त संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी, सदस्यांनी तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून, दूरध्वनीवरून आणि सामाजिक माध्यमांद्वारे शुभेच्छा दिल्या. अनेकांनी त्यांच्या नेतृत्वगुणांचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे संचालित प्राध्यापक संघांचे प्रदेशाध्यक्ष आणि पत्रकार संघ उत्तर महाराष्ट्र उपसचिव प्रो. डॉ. भागवत महाले यांनी भावना व्यक्त करताना सांगितले –“संतोष निकम यांचे मार्गदर्शन आणि नेतृत्व आम्हाला सतत प्रेरणा देते. त्यांच्या परिश्रमांमुळे संघटनेला नवे बळ आणि ओळख मिळाली आहे. पत्रकारितेतील सकारात्मक परिवर्तनासाठी त्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय आहे.”